BJP leader Sadhvi Pragya addressing a public event where her controversial statement went viral. saam tv
देश विदेश

Sadhvi Pragya Controversy Statement: पळून जाणाऱ्या मुलींच्या तंगड्या तोडा; साध्वी प्रज्ञासिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य

Sadhvi Pragya Sparks Controversial Statement: भाजप नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पालकांनी आज्ञा मोडणाऱ्या मुलींना शिक्षा करावी असे विधान साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलंय. हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत असून संतापाची लाट उसळली आहे.

Bharat Jadhav

  • साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुलींच्या वागणुकीवरून वादग्रस्त वक्तव्य केलं.

  • पळून जाणाऱ्या मुलींचे तगडे तोडा,” असं विधान त्यांनी केले आहे.

  • विरोधकांकडून साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेहमी आपल्या विधानांमुळे वादात अडकणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुलींना शिस्त लावण्यासाठी त्यांना मारहाण करावी. ज्या मुली दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत जाण्याचा विचार करत असतील पालकांनी त्यांच्या तंगड्या तोडून टाकले पाहिजेत, असं विधान त्यांनी एका कार्यक्रमात केलंय आहे. साध्वी प्रज्ञा यांचे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जेव्हा पालक आपल्या मुलांना मारहाण करतात. तेव्हा ते त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी असे करत असतात. ज्या मुली आपल्या पालकांची आज्ञा मोडतात, त्यांचा आदर करत नाहीत आणि घरातून पळून जाण्यास तयार असतात त्यांना मारझोड करत सुधारले पाहिजे. दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह यांचे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पालकांनो तुमच मन बळकट करा, इतकं मजबूत करा की जर तुमच्या मुलगी तुमचं म्हणणं ऐकत नाही.

जर ती कोणत्या दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत जाण्यास इच्छुक असतील तर त्यांचे पाय तोडून टाका तेव्हा तुमचे हात थरथर होता कामा नये, असं विधान साध्वी प्रज्ञा यांनी केलंय. ज्या संस्कार मानत नाहीत, ज्या ऐकत नाहीत त्यांना अशीच शिक्षा केली पाहिजे. जरी आपले मुलं असली तरी त्यांना मारहाण करा, त्यासाठी घाबरू नका. ज्या पालक आपल्या मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मारहाण करतात, त्यांच्या मारझोड करतात.

जेव्हा मुलगी जन्मायला येते तेव्हा महिला खूश होतात आणि आमच्या घरी लक्ष्मी, सरस्वती आल्याच म्हणतात. सर्व लोक शुभेच्छा देतात. पण जेव्हा या मुली मनमानी करतात, जेव्हा अशा मुली हट्टी बनतात. संस्कार मानत नाहीत. आई-वडिलांचे ऐकत नाहीत, ज्येष्ठ लोकांचे ऐकत नाहीत. दुसऱ्या धर्माच्या मुलासाठी घरातून पळून जाण्यास तयार असतात. तर पालकांनो सतर्क व्हा. अशा मुलींना मारहाण करत वटणीवर आणा, असं साध्वी प्रज्ञा म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT