Motivation Tips Saam Tv
देश विदेश

Sadhguru Jaggi Vasudev : सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर इमर्जन्सी ब्रेन सर्जरी; प्रकृती स्थिर

Sadhguru Jaggi Vasudev Health Update : ईशा फाउंडेशचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर इमर्जन्सी ब्रेन सर्जरी करण्यात आली आहे. जग्गी वासुदेव हे गेल्या चार आठवड्यांपासून गंभीर डोकेदुखीमुळे त्रस्त होते.

Vishal Gangurde

Sadhguru Jaggi Vasudev health Update :

ईशा फाउंडेशचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर इमर्जन्सी ब्रेन सर्जरी करण्यात आली आहे. जग्गी वासुदेव हे गेल्या चार आठवड्यांपासून गंभीर डोकेदुखीमुळे त्रस्त होते. या डोकेदुखीतही त्यांना दिनक्रम सुरुच ठेवला होता. त्यांनी ८ मार्चला शिवरात्रीचा कार्यक्रमही आयोजित केला होता. मेंदूच्या शस्त्रक्रियेबद्दल खुद्द सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी स्वत: माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

गेल्या आठवड्यातील १५ मार्चला सद्गुरु जग्गी वासुदेव यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना दुपारी ३.४५ वाजता दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांनी न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर डॉ. सुरी यांना जग्गी वासुदेव यांना सब-ड्यूरल हेमेटोमा असल्याची शंका झाली. यामुळे तातडीने एमआरआय करण्याचा सल्ला दिला. त्याच दिवशी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात त्यांच्या मेंदूचा एमआरआय केला. त्यानंतर मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव आढळल्याचे आढळून आले. (Health)

त्यानंतर जग्गी वासुदेव यांच्यावर डॉ. विनित सुरी, डॉ. प्रणव कुमार, डॉ. सुधीर त्यागी आणि डॉ. एस चटर्जी यांच्यासहित एका पथकाने शस्त्रक्रिया केली. मेंदूतील रक्तस्त्रावर उपचार केल्यानंतर १७ मार्चला त्यांच्यावर इमर्जन्सी ब्रेन सर्जरी केली. शस्त्रक्रिया केल्यानंतर जग्गी वासुदेव यांना व्हेंटिलेटरवरून हटविण्यात आलं आहे.

जग्गी वासुदेव यांच्या मेंदूत गेल्या ३-४ आठवड्यांपासून रक्तस्त्राव होत होता. यामुळे जग्गी वासुदेव यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. १७ मार्च रोजी डॉ. विनीत सुरी यांच्या नेतृत्वात इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जग्गी वासुदेव यांच्या सीटी स्कॅनमध्ये समोर आलं की, त्यांच्या मेंदूला सूज आली होती. त्यानंतर त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. १७ मार्च रोजी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या जग्गी वासुदेव यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT