Plane Crash Saam Tv
देश विदेश

Plane Crash: ५० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, उड्डाण घेतल्यानंतर संपर्क तुटला अन्...; पाहा VIDEO

Russia Plane Crash: ५० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याची मोठी बातमी समोर आली आहे. रशियाच्या सुदूर पूर्व भागामध्ये ही घटना घडली. उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा संपर्क तुटला आणि ते कोसळले. अपघातामध्ये सर्वांचा मृत्यू झाला.

Priya More

रशियामध्ये ५० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले. रशियाच्या सुदूर पूर्व भागामध्ये हे विमान कोसळले. कोसळल्यानंतर या विमानाचे तुकडे तुकडे झाले. या अपघातामध्ये विमानामध्ये असलेल्या सर्व ५० प्रवाशांचा मृत्यू झाला. हे विमान AN-24 प्रवासी विमान होते. सायबेरियाच्या अंगारा एअरलाइन्स या कंपनीचे हे विमान असल्याचे सांगितले जात आहे. या विमान अपघातानंतरचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रशियामध्ये AN-24 ट्विन टर्बोप्रॉप प्रवासी विमान कोसळले. हे विमान ब्लागोवेश्चेन्स्कहून टिंडा येथे जात होते. चीन सीमेजवळील अमूर प्रदेशात हे विमान कोसळले. उड्डाणा केल्यानंतर या विमानाचा अचानक हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली.

हे विमान चीनच्या सीमेनजीकच्या अमूरमधील टिंडा शहराच्या दिशेने जात होते. हे विमान टिंडा शहरातील विमानतळावर पोहचण्यापूर्वीच त्याचा संपूर्क तुटला. या विमानामध्ये ५ मुलांसह ४३ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. या सर्वांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

अपघातग्रस्त विमान उड्डाण घेतल्यानंतर त्याच्या गंतव्यस्थानाच्या काही किलोमीटर आधी रडारवरून गायब झाले. अपघातानंतर या विमानाचे तुकडे तुकडे झाले. याचे फोटो देखील समोर आले आहेत. घटनास्थळावर बचाव कार्य सुरू आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थाच्या वृत्तानुसार, या अपघातामध्ये विमानातून प्रवास करणारा एकही जण जिवंत राहिला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT