pahalgam attack saam tv
देश विदेश

India Pakistan Tension: पाकविरोधात रशियाचा भारताला पाठिंबा पुतिन येणार,पाक बेचिराख होणार? महासत्तांचा भारताला पाठिंबा, पाकची डोकेदुखी वाढली

Russia support India: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरोधात पाठिंबा मिळायला सुरुवात झालीय. त्यामुळे भारताला लढ्याला मोठं बळ मिळाणारेय. त्यामुळे पाकिस्तानच्या याचनेला धुंडकावून भारताला कुणी पाठिंबा दिलाय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी घडतायत. अमेरिका आणि रशिया या महाशक्तींनी उघडपणे भारताला पाठिंबा दिलाय. दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेचे महाशक्तींनी समर्थन केलयं. त्यामुळे राजनैतिक पातळीवरच नव्हे तर सामरिक सहकार्यानं भारताने पाकची डोकेदुखी वाढवलीय. त्यात अमेरिकन संसदेचे अध्यक्ष माइक जॉनसन यांनी भारताला पाठिंबा देत थेट शस्त्रास्त्र पुरवणार असल्याचं सांगितलयं.

रशियाचे अध्यक्ष ब्दादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम हल्ल्याचा निषेध नोदवला. त्यामुळे पाकविरोधात भारताला कुणी पाठिंबा दिलाय. आणि पाक कुणाच्या जीवावर नसत्या उठाठेवी करतोय, ते ही पाहूयात...

युद्धाची भाषा करणं आणि युद्ध करणं यात जमिन आसमानाचा फरक आहे. मात्र या युद्धाचे थेट परिणाम भुराजकीय संबंधांवर होतात...त्यामुळे आर्थिक गणितांपेक्षा जागतिक राजकीय संबंध मजबुत करण्याकडे भारताचा नेहमीच कल राहीलाय. आणि म्हणूनच जागतिक महासत्ता अमेरिका आणि रशियाचा भारताला पाठिंबा मिळतोय.

त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झालीये. तरीही चीनी बॉम्ब घेऊन तुर्की आणि अजरबैजानच्या फुसक्या बळावर युद्धाची भाषा पाक करतोय. ते पीओकेस्थित दहशतवाद्यांचे अड्डे वाचवण्यासाठीच की काय अशी शंका उपस्थित होते..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

बलात्काराचा आरोप असलेल्या पोलिसाकडून आत्मसमर्पण; डॉक्टर तरूणी आत्महत्या प्रकरणात बदने नेमकं काय म्हणाले?

BJP Leader Shot : भाजप नेत्यावर दिवसाढवळ्या धाडधाड गोळ्या झाडल्या, ५ जण घरात घुसलं अन्...

Ahmednagar Tourism : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला खूप आवडते? मग, अहमदनगरमधील 'हे' ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट

Manoj Bajpayee : "फोटो खिंचवाने थोडी आये है..."; मनोज बाजपेयी पापाराझींवर संतापले, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT