Jowar Kadhi Recipe: रोजच्या जेवणात काहीतरी वेगळं हवंय? झटपट तयार होणारी खमंग खान्देशी ज्वारी कढी नक्की ट्राय करा

Surabhi Jayashree Jagdish

ज्वारीची कढी

खान्देशातील ज्वारीची कढी ही पारंपरिक आणि पौष्टिक अशी डिश मानली जाते. ग्रामीण भागात विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात ही कढी शरीराला थंडावा देण्यासाठी केली जाते. ज्वारीचं पीठ, ताक आणि साधे मसाले वापरून बनणारी ही कढी चविष्ट आणि पचायला हलकी असते.

ज्वारीचे पीठ

कढीसाठी नेहमी ताजं आणि बारीक ज्वारीचे पीठ वापरा. जुने किंवा ओलसर पीठ घेतल्यास कढीचा स्वाद बिघडू शकतो. त्यामुळे शक्यतो घरी दळलेलं पीठ वापरा.

ताकाची तयारी

कढीसाठी आंबटसर ताक वापरणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे कढीला छान चव येते. ताक खूप पातळ किंवा खूप घट्ट नसावं. जर ताक खूप आंबट असेल तर त्यात थोडे पाणी घाला.

मिश्रण तयार करणे

एका भांड्यात ज्वारीचे पीठ आणि ताक एकत्र करून गाठी न राहणार नाहीत असं व्यवस्थित ढवळून घ्या. हे मिश्रण अगदी गुळगुळीत झालं पाहिजे नाहीतर कढी करताना गुढळ्या तयार होतात.

कढी शिजवण्याची प्रक्रिया

तयार मिश्रण मंद आचेवर ठेवून सतत हलवत शिजवा. कढी उकळायला लागल्यावर तिचा रंग आणि घट्टपणा बदलू लागतो. त्यामुळे सतत ढवळणं खूप आवश्यक आहे नाहीतर कढी खाली लागू शकते.

फोडणी देणं

एका कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता घाला. ही फोडणी कढीत घातल्यावर तिचा सुगंध आणि चव अधिक वाढते. काही ठिकाणी लसूण आणि सुक्या मिरच्याही घालतात ज्यामुळे कढीला खास चव येते.

चव बघा

कढीत चवीनुसार मीठ आणि थोडी हळद घाला. काही जण थोडासा गूळ घालून कढीला हलकी गोडसर चव देतात.

सर्व्ह करण्याची पद्धत

गरमागरम ज्वारीची कढी भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह केली जाते. ही कढी साध्या जेवणाला एक वेगळीच चव देते. खान्देशात ही कढी खास पारंपरिक पद्धतीने खाल्ली जाते.