Vladimir Putin Drone Strike: रशियातील राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. या पुतिन (Vladimir Putin) पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती रशियन पॉवर सेंटर 'क्रेमलिन'ने (Kremlin) दिली आहे. क्रेमलिनच्या दाव्यानुसार, 'हत्येचा प्रयत्न' झाल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांचे काम नेहमीप्रमाणे पूर्ण पाडले. या हल्ल्याचे ठिकाण युक्रेन सीमेपासून 280 किमी अंतरावर आहे.
क्रेमलिनने बुधवारी 3 मे रोजी रात्री हे निवेदन जारी केले. या निवेदनात "काल रात्री कीव (युक्रेन) सरकारने रशियन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांची दोन मानवरहित हवाई वाहने (ड्रोन्स) हल्ला करण्यासाठी आली होती, ते रशियन सैन्याने शोधून पाडले", असे म्हटले आहे. तसेच हे दोन्ही ड्रोन आम्हाला हानी पोहोचवू शकले नाहीत. त्या दोन्ही ड्रोनचा भंगारही जप्त करण्यात आले असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. (latest international news)
आम्ही अशा कृत्यांमुळे घाबरणार नाही: क्रेमलिन
क्रेमलिनने म्हटले की, "आम्ही या ड्रोन हल्ल्याकडे विजय दिन आणि 9 मे च्या परेडपूर्वी केलेला पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला म्हणून पाहतो. राष्ट्रपतींना लक्ष्य करणारा आणि त्यांच्या हत्येचा प्रयत्न म्हणून या हल्याकडे आम्ही पाहतो. आम्ही हे स्पष्टपणे सांगत आहोत की आम्ही अशा प्रकारच्या कृत्यांमुळे घाबरणार नाही. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की विजय दिन परेड देखील वेळापत्रकानुसार आयोजित केली जाईल." (Latest Political News)
'राष्ट्रपती केवळ मॉस्कोतील अधिकृत निवासस्थानी उपस्थित'
क्रेमलिनने सांगितले की "या दहशतवादी हल्ल्यात राष्ट्रपतींना दुखापत झाली नाही. ते त्यांच्या वेळापत्रकानुसार त्यांच्या कामात व्यस्त होते. त्यांनी आज मॉस्कोबाहेरील निझनी नोव्हगोरोड प्रदेशाचे गव्हर्नर ग्लेब निकितिन यांच्यासोबत कामकाजाची बैठक घेतली. यावेळी गव्हर्नर यांनी त्यांना सामाजिक-आर्थिक विकास तसेच गुंतवणूक आणि बांधकाम प्रकल्प आणि वाहतूक पायाभूत सुविधांबाबत माहिती दिली." (Latest Marathi News)
'प्रतिहल्ला करण्याचा आमचा अधिकार सुरक्षित'
ड्रोन हल्ल्याच्या प्रत्युत्तराबाबत क्रेमलिनने म्हटले की, आता रशिया या हल्ल्याला आपल्या शैलीत प्रत्युत्तर देईल. "हा आमच्या राष्ट्राध्यक्षांवर नियोजित दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न आहे. त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे याचा अधिकार आमच्याकडे आहे. आम्ही वेळीच प्रत्युत्तराची कारवाई केली. आम्ही दोन्ही ड्रोन पाडले."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.