Moscow Shooting Saam Tv
देश विदेश

Moscow Shooting: रशियातील मॉस्कोत दहशतवादी हल्ला, दहशतवाद्यांच्या अंधाधुंद गोळीबारात 40 जणांचा मृत्यू; 100 हून अधिक जखमी

Russia news: एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियाची राजधानी मॉस्कोजवळील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये स्फोट आणि गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Satish Kengar

Moscow Shooting:

एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियाची राजधानी मॉस्कोजवळील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये स्फोट आणि गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मॉस्कोजवळील क्रोकस सिटी हॉलमध्ये तीन लोकांनी गोळीबार केल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

रशिया टुडेने काही मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत गोळीबाराच्या घटनेत 40 लोकांचा मृत्यू आणि 100 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगितले. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रशिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, क्रोकस सिटी हॉलजवळ ही घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष दलाचे जवानही क्रोकस सिटी हॉलमध्ये पोहोचले असून बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज अद्यापही ऐकू येत आहे. (Latest Marathi News)

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार सुरू झाल्यानंतर स्फोट झाला. TASS वृत्तसंस्थेनुसार, लोकांना येथून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कॉन्सर्ट हॉलमध्ये लागलेल्या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओ फुटेजमध्ये लोकांचा जमाव हॉलमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. यामध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा आवाजही ऐकू येत आहे. एका व्हिडिओमध्ये हल्लेखोरही दिसत आहेत.

स्पुतनिक वृत्तसंस्थेनुसार, क्रोकस हॉलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या आधी मॉस्कोमधील अमेरिकन दूतावासाने संभाव्य हल्ल्याची भीती व्यक्त केली होती. अमेरिकन दूतावासाने 7 मार्च रोजी त्यांच्या वेबसाइटवर एक निवेदन प्रसिद्ध केले होते. यात सांगण्यात आलं होतं की, ''मॉस्कोतील क्रोकस हॉलमध्ये अतिरेकी हल्ला करण्याची योजना आखात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. येथील अमेरिकन नागरिकांनी पुढील 48 तास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंदू मिल स्मारकाला २०२७ ची डेडलाईन! स्मारकासाठी सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्याचे महत्त्वाचे आदेश

Maharashtra News Live Update: अशैक्षणिक कामे थांबवा! शिक्षकांना त्याचं काम करू द्या - सचिन सानप

Pension Rules : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोठी अपडेट! सरकारचे नवे निर्देश; काय बदलणार?

Mumbai : कबुतरांना दाणे टाकणे महागात पडणार; महापालिका थेट आकारणार दंड

नोकरदारांसाठी मोठी अपडेट! EPFO मध्ये अतिरिक्त रक्कम भरण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या काय होऊ शकतो बदल

SCROLL FOR NEXT