Moscow terrorist attack video  Saam TV
देश विदेश

Moscow Terrorist Attack: मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू; शेकडो जखमी, गोळीबाराचा VIDEO समोर

Moscow terrorist attack: रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमधील एका कॉन्सर्ट हॉलवर शुक्रवारी (ता. २२) ५ बंदुकधारी दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला आहे.

Satish Daud

Moscow terrorist attack video

रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमधील एका कॉन्सर्ट हॉलवर शुक्रवारी (ता. २२) ५ बंदुकधारी दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनं संपूर्ण जग हादरवून गेलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबार आणि बॉम्बस्फोटाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. गोळीबार आणि बॉम्बस्फोटाची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड इराक (ISIS) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. (Latest Marathi News)

ISIS ने आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक निवेदन जारी केलं आहे. 'आमच्या सैनिकांनी रशियाची राजधानी मॉस्कोच्या बाहेरील क्रोकस कॉन्सर्ट हॉलवर हल्ला केला.' हल्लेखोर सुरक्षितपणे त्यांच्या तळांवर परतले आहेत, असे आयएसने निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, रशियन मीडियाने दहशतवाद्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने म्हटले आहे की, हल्लेखोर 'आशियाई आणि कॉकेशियन' लोकांसारखे दिसत होते. हल्लेखोर परदेशी भाषेत बोलत होते.

दहशतवादी इंगुशेतियाचे मूळ रहिवासी असल्याचा दावा रशियन मीडियाने केला आहे. लष्करी गणवेश घातलेले दहशतवादी इमारतीत घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. जो समोर दिसत होता त्याला गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यानंतर स्फोट झाला, त्यामुळे कॉन्सर्ट हॉलला आग लागली होती.

दहशतवादी हल्ल्याच्या वेळी क्रोकस कॉन्सर्ट हॉलमध्ये जवळपास ६ हजार लोक उपस्थित होते. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून हल्लेखोरांचा शोधून खात्मा केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Travel Hacks: लोकल प्रवासात उलटी होत असेल तर लिंबू ठेवा जवळ; मिळेल त्वरित आराम

Heart attack in bathroom: बऱ्याच जणांना बाथरूममध्येच हार्ट अटॅक का येतो? यामागे काय कारणं आहे, जाणून घ्या

Sanjay Shirsat : शिरसाटांच्या हातात सिगारेट अन् बेडवर पैशांनी भरलेली बॅग; संजय राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, VIDEO

Rohit Sharma : रोहित शर्माचा पत्ता कट होणार? कसोटीनंतर वनडेमध्येही शुभमन गिल कॅप्टन बनणार?

Panvel Corporation : शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावणे भोवले; मुख्याध्यापिका निलंबित, शिक्षणाधिकाऱ्यास बजावली नोटीस

SCROLL FOR NEXT