नवी दिल्ली : मॉस्कोहून दिल्लीला (Delhi) येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांमध्ये एकाच घबराट पसरली. पहाटे 3.20 वाजता विमान दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) उतरले. त्यानंतर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रवाशांच्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Delhi IGI Airport Bomb Threat)
सध्या संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात येत असून विमानतळावर बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांचे सामान तपासले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण विमानतळाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 11.15 वाजता मॉस्कोहून दिल्लीला येत असलेल्या फ्लाइटमध्ये 3:20 वाजता एका कॉलवरून बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. यानंतर बॉम्बशोधक पथक, बचाव पथके तैनात करण्यात आली.
सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र, दिल्ली पोलिसांना अशी कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी फ्लाइटमध्ये 386 प्रवासी आणि 16 क्रू मेंबर्स होते. प्रथमदर्शनी हा बॉम्बचा फोन अफवा असल्याचे मानले जात आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.