Buldhana : नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महतेच्या संख्येमुळे चिंता वाढली आहे.
Buldhana Farmer News
Buldhana Farmer NewsSaam Tv
Published On

बुलढाणा - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महतेच्या संख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यातच आता बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी (Farmer) आत्महत्या केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. मात्र सर्वदूर असे चित्र असले तरी सरकार कडून मात्र अजून तातडीची पावले उचलण्यात आली नाहीत. सोयाबीन आणि कापसाच्या दरात घसरण सुरूच आहे.

याच काळात मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्ज बाजारिला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. (Buldhana Latest News In Marathi)

Buldhana Farmer News
Eknath Khadse : ...अन् एकनाथ खडसे रात्रभर पोलीस स्टेशनसमोरच झोपले; काय आहे प्रकरण?

नामदेव यांच्याकडे तीन एकर शेती आहे. मात्र सततची नापिकी, अतिवृष्टी व वाढत्या कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर एक लाख रुपयांचे कर्ज होते. दरम्यान, दुसरी आत्महत्येची घटना चिखली तालुक्यातील अंचरवाडी शिवारात घडली आहे.

चिखली तालुक्यातील केळवद येथील एम. ए. डी. एड झालेल्या उच्चशिक्षित शेतकऱ्याने अंचरवाडी शिवारातील खडकपूर्णा कालव्यात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. समाधान पांढरे ( ३२, रा. केळवद) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. (Tajya News)

समाधान पांढरे यांच्याकडे ४ एकर कोरडवाहू शेती होती. त्यांच्यावर १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज होते. अतिवृष्टी व सततच्या नापिकीमुळे होणाऱ्या आर्थिक विवंचनेला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com