MP Ruhullah Mehdi Resignation AI Image
देश विदेश

Breaking News : मोठी बातमी! बडा नेता देणार राजीनामा; तारीखही ठरली, राजकारणात खळबळ

Jammu Kashmir MP Ruhullah Mehdi Resignation News : जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्समधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. खासदार रुहुल्लाह मेहदी यांनी ३ नोव्हेंबरला पक्षाचे सदस्यत्व आणि लोकसभा खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

Alisha Khedekar

  • खासदार रुहुल्लाह मेहदी देणार राजीनामा

  • ३ नोव्हेंबर रोजी नॅशनल कॉन्फरन्स आणि लोकसभा खासदारकीचा राजीनामा देण्याचे जाहीर

  • मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलामुळे नॅशनल कॉन्फरन्समधील काही आमदार नाराज

  • निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप

जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलानंतर पक्षातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच आता पक्षाचे खासदार रुहुल्लाह मेहदी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी आपण पक्षाचे सदस्यत्व आणि लोकसभा खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

शुक्रवारी श्रीनगरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या काही नाराज आमदारांनी एकत्र येत बैठक घेतली. या बैठकीत पक्षातील परिस्थिती आणि पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळातील बदलांमुळे अनेक नेते नाराज असल्याची चर्चा याआधीपासूनच सुरू होती. दरम्यान, रुहुल्लाह मेहदी यांनी सोशल मीडियावर पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीच्या वेळी जनतेला दिलेली आश्वासने सत्तेत आल्यानंतर पूर्ण करण्यात आली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

पक्षाच्या नेतृत्वाला जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःच्या राजकीय हिताची अधिक काळजी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नॅशनल कॉन्फरन्सने निवडणुकीपूर्वी कलम ३७० पुन्हा लागू करणे, तुरुंगात असलेल्या लोकांची सुटका आणि जम्मू-काश्मीरचे अधिकार सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर या मुद्द्यांवर अपेक्षित पावले उचलली गेली नाहीत, अशी नाराजी मेहदी यांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून मेहदी हे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या सरकारवर टीका करत आहेत. पक्षाने आपल्या विचारपासून दूर जाऊ नये, अशी त्यांची भूमिका राहिली आहे. ३ नोव्हेंबर रोजी बडगाम येथे त्यांचे वडील आणि माजी आमदार आगा सैयद मेहदी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बहिश्त-ए-ज़हरा पार्क येथे ते जनसभेला संबोधित करणार आहेत. मेहदी यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर ते पुढे कोणती राजकीय भूमिका घेणार आणि श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड

Vastu Tips: घरात दरवाजाच्या मागे कपडे लटकवणं शुभ की अशुभ? वाचा वास्तूशास्त्राचा नियम नेमकं काय सांगतो

Ladki Bahin Yojana: ऑक्टोबर संपला लाडक्या बहिणींना ₹1500 कधी मिळणार? महत्वाची अपडेट समोर

Maharashtra Epstein Files: अशोक खरातची भूमिका साकारणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता! 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'मधील गूढ उकललं

Shraddha Kapoor Photo : अप्सरा आली...; नऊवारी साडीत श्रद्धा कपूरचा मराठमोळा थाट! गजरा अन् नथीच्या नखरा पाहून चाहते घायाळ

SCROLL FOR NEXT