Income Tax Returns Updates Saam tv
देश विदेश

ITR Return Last Date : 'आयटीआर' भरताना नवीन कर प्रणाली निवडावी की जुनी? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

Income Tax Slabs: 'ITR' भरताना नवीन कर प्रणाली निवडावी की जुनी? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

New Income Tax Slabs FY 2023-24 : नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली असून 31 मार्चनंतर बऱ्याच लोकांनी आरटीआय फाईल (Income Tax) करण्याची प्रक्रिया सुरु देखील केली आहे.

मात्र आरटीआय फाईल करताना नवीन कर प्रणाली निवडावी की जुनी? याबाबत बहुतांश लोक संभ्रमात आहेत. कारण यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर (Income Tax) प्रणालीत सुधारणा करून लोकांसमोर मांडण्याचा दावा केला आहे.

पण नवीन कर प्रणाली खरोखरच सर्व लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे का? याशीच संबंधित काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

प्रश्न : नवीन कर प्रणाली (Income Tax New Slab) प्रत्येकासाठी चांगली आहे का?

उत्तर: या प्रश्नाचं उत्तर देताना आयकर तज्ञ प्रीती शर्मा (टॅक्स पार्टनर, BDO India) म्हणाल्या की, नवीन कर प्रणाली हा एक चांगला प्रयोग आहे. आपल्या एकूण लोकसंख्येतील एका मोठ्या वर्गासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ज्यात कुठेही गुंतवणूक नाही. म्हणजेच जर तुम्ही कर बचतीसाठी गुंतवणूक केली नसेल, तर तुम्ही नवीन कर प्रणाली निवडावा, ज्यामुळे तुम्हाला कमी कर भरावा लागेल. (Latest Marathi News)

प्रश्नः वार्षिक वेतन 7 लाख रुपये असल्यास काय करावे?

उत्तर: नवीन कर प्रणालीमध्ये (New Tax Slab) 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कराची तरतूद नाही. जर तुम्हीही वार्षिक 7 लाख रुपये कमावत असाल तर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. जुन्या कर प्रणालीची निवड करताना तुम्हाला कर भरावा लागेल किंवा कर बचतीसाठी गुंतवणूक करावी लागेल. जुन्या कर प्रणालीमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर भरावा लागत नव्हता. मात्र आता ही मर्यादा 7 लाख रुपये करण्यात आली आहे.

प्रश्न: जुनी कर प्रणाली (Old Tax Slab) कोणासाठी फायदेशीर आहे?

उत्तर: जर तुम्ही कर बचतीसाठी गुंतवणूक केली तर वजावटीचा फायदा घेऊन तुम्ही जुन्या कर प्रणालीमधूनच अधिक पैसे वाचवू शकता. यासाठी गृहकर्ज (Home Loan), एनपीएस, सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana), पीपीएफ (PPF), मुदत ठेव, वैद्यकीय विमा असे पर्याय निवडावे लागतील. ज्यांना गुंतवणूक करायची नाही त्यांच्यासाठी नवीन कर प्रणाली चांगली आहे.

प्रश्न: 10 लाख रुपये वार्षिक पगार असलेल्यांसाठी कोणता पर्याय चांगला आहे?

उत्तरः जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल तर नवीन कर प्रणालीनुसार 60 हजार रुपये आयकर भरावा लागेल. याशिवाय 4 टक्के सेसची तरतूद आहे. परंतु 10 लाख उत्पन्न असलेल्या व्यक्तीने जुन्या कर प्रणाली निवडली आणि सर्व आयकर सवलतींचा लाभ घेतला तर त्याच्यासाठी फक्त जुनी कर प्रणाली फायदेशीर ठरेल. कारण जुन्या कर प्रणालीमध्ये 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. याशिवाय गृहकर्जावर 2 लाखांची सूट, एनपीएसमध्ये गुंतवणूक करून अतिरिक्त 50 हजार रुपयांची सूट आणि वैद्यकीय विम्याचा हप्ता भरल्यास स्वत:चे उत्पन्न पूर्णपणे करमुक्तीखाली येऊ शकते.

प्रश्न: 10 लाख वार्षिक पगार असलेल्यांसाठी New Tax Slab कसा चांगला आहे का?

उत्तरः यापूर्वी 3 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 22500 रुपये कर आकारला जात होता, तो आता 15000 रुपयांवर आणण्यात आला आहे. म्हणजेच 7500 रुपयांचा फायदा होईल. त्याचप्रमाणे 6 ते 9 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना आता पूर्वीच्या तुलनेत 15,000 रुपये, तर 9 ते 12 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना 25,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न 12 ते 15 लाख रुपये आहे, त्यांना 37,500 रुपये अधिक वाचतील. जर तुमचा पगार 10 लाख असेल आणि तुम्ही कुठेही गुंतवणूक करत नसाल तर नवीन कर प्रणाली तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

प्रश्नः जुनी कर प्रणाली निवडण्यासाठी काय करावे लागेल?

उत्तर: सरकारने स्पष्ट केले आहे की, जुन्या कर प्रणालीचा पर्याय अजूनही लोकांना उपलब्ध असेल. मात्र करदात्याला नवीन कर प्रणाली नको असेल तर त्याला जुनी कर प्रणाली निवडावी लागेल. आता पहिला पर्याय नवीन कर प्रणाली असेल, तर दुसरा असेल जुनी कर प्रणाली.

प्रश्न: नवीन कर प्रणाली काय आहे? (What Is New Tax Slabs in India)

उत्तर : यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने नवीन कर प्रणाली आणली आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत मूळ सूट मर्यादा आता 3 लाख रुपये करण्यात आली आहे. जी आधी अडीच लाख रुपये होती. आता 6 टॅक्स स्लॅब ऐवजी 5 टॅक्स स्लॅब असतील. नवीन कर प्रणालीमध्ये 15.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 52,500 रुपयांची मानक कपात करण्यात आली आहे.

नवीन कर प्रणालीमध्ये कर सूट मर्यादा -

  • 0 ते 3 लाख 0 टक्के

  • 3 ते 6 लाखांवर 5 टक्के

  • 6 ते 9 लाखांवर 10 टक्के

  • 9 ते 12 लाखांवर 15 टक्के

  • 12 ते 15 लाखांवर 20 टक्के

  • 15 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 30 टक्के

प्रश्नः जुनी कर प्रणाली म्हणजे काय? (What Is Old Tax Slabs in India)

उत्तरः जुन्या कर प्रणालीमध्ये 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कराची तरतूद आहे. मात्र सरकार यावर 12,500 ची सूट देते. साधे गणित असे आहे की, जुन्या कर प्रणालीमध्ये तुम्हाला 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागत नव्हता.

जुन्या कर प्रणालीमध्ये कर सूट मर्यादा -

  • 2.5 लाखांपर्यंत - 0%

  • 2.5 लाख ते 5 लाख - 5%

  • 5 लाख ते 10 लाख - 20%

  • 10 लाखाच्या वर - 30%

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray :...तर १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा, नाही थोबाड फोडल्यास मला विचारा; उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

Maharashtra News Live Updates: मुंबादेवी मतदारसंघात मनसे आणि शिवसेना शिंदे गटाची छुपी युती?

CJI DY Chandrachud : कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा; निरोप समारभांच्या भाषणात सरन्यायाधीश चंद्रचूड नेमकं काय म्हणाले?

IND vs SA 1st T20I: यजमान दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय; प्लेइंग ११ मध्ये कोणाला मिळालं स्थान?

Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? अमित शहांच्या वक्तव्यानंतर भाजपमधून आली पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT