Arvind Jagtap Poem: महाराजांचा मावळा हो.. बाकी समदं फडतूस! अरविंद जगतापांचं मार्मिक भाष्य, कविता एकदा वाचाच
Mumbai News : उद्धव ठाकरे यांनी देंवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना फडतूस शब्दाचा वापर केला. उद्धव ठाकरेंनी 'फडतूस गृहमंत्री' म्हणत केलेली टाकी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. या टीकेनंतर भाजपचे नेते उद्धव ठाकरेंवर अक्षरश: तुटून पडले आहे. नेत्यांसह दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते देखील आपआपल्या नेत्यांच्या बाजूनं बोलताना दिसत आहे.
कवी, लेखक, पटकथाकार अरविंद जगताप यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर आपल्या कवितेतून भाष्य केलं आहे. त्यांनी आपली कवित फेसबूकवर शेअर केली आहे. महाराजांचा मावळा हो.. बाकी समदं फडतूस! असा बहुमोलाचा सल्ला अरविंद जगताप यांनी तरुणाईला दिला आहे. (Latest News Update)
अरविंद जगताप यांची कविता
भावा
तू कशाला चिडतूस?
आन कुणामुळं रडतूस?
बेरोजगार आसून ऊडतूस,
महागाईला कवा भिडतूस?
नेत्याचं धुणं रोज काढतूस
बापाचं पांग कवा फेडतूस?
तुझ्या पोटापाण्याचं सोडतूस
आन नकू त्या वादात पडतूस !
तू चमचा व्हायचा इचार कवा एकदा सोडतूस?
महाराजांचा मावळा हो.. बाकी समदं फडतूस!
फेसबूक पोस्टवरील प्रतिक्रिया
अरविंत जगताप यांच्या कवितेवर अनेकांनी कमेंट केल्या आहे. असं लिहिताना काळजी घ्या, नाहीतर ed वाले कवितांवर गुन्हा नोंदणी करून आत टाकायचे, अशी कमेंट एकाने केली आहे. तर बाकी समदं फडतूस आणि महाराजांचा मावळा फक्त व्हायचं बरोबर आहे. पण मग त्यांना आजच्या काळाप्रमाणे लागू होणारी मावळ्यांची व्याख्या पण सांगावी लागेल साहेब, अशी कमेंट एका यूजरने केली आहे. (Political News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.