madhya pradesh clash news  Saam tv
देश विदेश

RSS आणि भाजप नेत्यामध्ये जोरदार हाणामारी; पोलीस स्टेशनबाहेर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा गराडा, परिसरात तणावाचं वातावरण

madhya pradesh clash news : आरएसएस आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. दोन्ही नेत्यांचा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला.

Vishal Gangurde

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये मोठा राडा

RSS आणि भाजप नेत्यांमध्ये हाणामारी

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला सुरू

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये कुत्र्याला खाऊ घालवण्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चेतन पवार आणि भाजप नेते वीरेंद्र शेडगे यांच्यात वाद झाला. दोघांमधील वाद थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. वादानंतर दोन्ही गटाच्या लोकांनी थेट पोलीस स्टेशनला घेरल्याचे दिसून आलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

टीव्ही९ वृत्तानुसार, आरएसएस नेते चेतन पवार हे भाजप नेते वीरेंद्र शेडगे यांच्या घराबाहेर भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत होते. यामुळे वीरेंद्र शेडगे यांनी घरासमोर कुत्र्यांना खाऊ घालण्यास विरोध केला. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये शा‍ब्दिक चकमक झाली. पुढे दोन्ही नेत्यामध्ये वादानंतर हाणामारी झाली. वीरेंद शेडगे यांनी चेतन पवार यांना बेदम मारहाण केली.

हाणमारीच्या घटनेनंतर चेतन पवार यांनी पोलिसांत धाव घेतली. चेतन पवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास नकार दिला. त्यामुळे चेतन पवार यांनी संपूर्ण घटनेची माहिती आरएसएसच्या वरिष्ठ नेत्यांना दिली. त्यानंतर भडकलेल्या आरएसएस कार्यकर्त्यांनी वीरेंद्र शेडगे यांच्या कार्यालय आणि घराबाहेर जाऊन तोडफोड केली.

दोन्ही गटाचा वाद चिघळल्यानंतर पोलीस स्टेशनबाहेर मोठ्या संख्येने जमाव जमला. त्यानंतर पोलिसांनी चेतन पवार यांची तक्रार घेत तपासाला सुरुवात केली. वीरेंद्र शेगडे यांचा काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला होता.

तत्पूर्वी, वीरेंद्र शेगडे यांच्या विरोधात पक्षाने कारवाई करावी, यासाठी भाजपच्या सुमित मिश्रा यांनी वरिष्ठांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी शेगडे यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी केली. या प्रकरणात भाजप काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल. तसेच पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

SCROLL FOR NEXT