Gujarat Cyber Fraud: Saam Tv
देश विदेश

Cyber Fraud: २५०० कोटींचा सायबर फ्रॉड, बँकेच्या ३ अधिकाऱ्यांसह २० जणांना अटक

Gujarat Cyber Fraud: गुजरातमध्ये सायबर फ्रॉडचा भंडाफोड करण्यात पोलिसांना यश आले आहे. २५०० कोटींचा सायबर फ्रॉड करण्यात आला. या प्रकरणी बँकेच्या ३ अधिकाऱ्यांसह २० जणांना अटक करण्यात आली.

Priya More

Summary -

  • गुजरातच्या राजकोटमध्ये २५०० कोटींचा सायबर फ्रॉड उघड

  • ३ बँक अधिकाऱ्यांसह २० आरोपींना अटक

  • बनावट बँक खात्यांचा वापर करून करत होते व्यवहार

गुजरातमधून मोठ्या सायबर फ्रॉडची बातमी समोर आली आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये २५०० कोटी रुपयांचा सायबर फ्रॉडचा भंडाफोड झाला आहे. या प्रकरणात खासगी बँकेच्या ३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी या तिघांना अटक केली. या प्रकरणात एकूण अटक करण्यात आलेल्या आरोपीची संख्या २० वर पोहचली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,राजकोटचे पोलिस अधीक्षक विजय गुर्जर यांनी सांगितले की, पाधाधरी येथील एस बँकच्या पर्सनल मॅनेजर मौलिक कामानी, जामनगर येथील एक्सिस बँकचे मॅनेजर कल्पेश डांगरिया, एचडीएफसी बँकेचे पर्सनल बँकर अनुराग बाल्धा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली.

मौलिक कामानी यांच्यावर आरोप आहे की, अटक केलेल्या आरोपींना संशयास्पद बँक खाती उघडून देण्यास आणि ती चालवण्यास मदत केली. मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी बँकेच्या सूचना टाळण्याकरिता त्याने विविध कागदपत्रांचा वापर करून ती खाती सक्रीय ठेवली.

तर कल्पेश डांगरियाने बनावट ओळखपत्रांचा वापर करून बँक खाती उघडण्यास मदत केली. दुसरीकडे अनुराग बाल्धाने पडताळणी आणि प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून नवीन खाती उघडली. या तिन्ही अधिकाऱ्यांनी खात्यातून रोख रक्कम काढण्याची सोय देखील केली होती. जी नंतर हवाला मार्गाने हस्तांतरित केली जात होती.

अटकेनंतर तिन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आधीच अटक केलेले इतर आरोपी तुरुंगातच आहेत. आतापर्यंत पोलिसांनी या रॅकेटशी संबंधित ८५ बँक खाती शोधून काढली आहेत. या प्ररकरणासंबंधी सायबर क्राईम पोर्टलवर ५३५ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT