Rs 2000 exchange
Rs 2000 exchange  Saam TV
देश विदेश

2000 Rs Note Exchange Today: आजपासून 2000 रुपयांची नोट मिळणार बदलून, बँकेत जाण्यापूर्वी जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या या 7 प्रश्नांची उत्तरं

Priya More

2000 Rupee Note Ban: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 19 मे रोजी 2000 रुपयांची नोट चलनातून बंद करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या 2000 रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांना बँकेमध्ये जावे लागेल. बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची प्रक्रिया 23 मेपासून म्हणजेच आजपासून सुरू (2000 Rs Note Exchange Today) होत आहे.

जर तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन नोट बदलू शकता. याशिवाय तुम्ही हे पैसे खात्यातही जमा करू शकता. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक दिवस अगोदर नागरिकांना नोटा बदलण्याची घाई करू नका ,असे आवाहन केले आहे. 2000 रुपयांची नोट वैध असून पुढील चार महिन्यांत ती कधीही बदलता येणार आहे. पण या नोट बदलीबाबत नागरिकांना अनेक प्रश्न पडले आहेत. त्या प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बँकेमध्ये नोट बदलायला जाण्यापूर्वी त्यांनी हे या प्रश्नांची उत्तरे नक्की जाणून घ्यावीत.

नोटा कधीपर्यंत बदलता येतील?

आरबीआयकडून 2000 रुपयांची नोट 23 मे ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये बँकांमध्ये जाऊन बदलता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तुम्ही 2000 रुपयांची नोट बदलून ते पैसे खात्यातही जमा करू शकता. एका वेळी फक्त 10 नोटा बदलता येणार आहे. आरबीआयने आदेशात असेही म्हटले आहे की, 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर काढली जात आहे. तुम्ही या नोटांवर वस्तू खरेदी करू शकता.

नोटा बदलायला पैसे लागतील का?

बँकेतून 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही, असे आरबीआयने आधीच स्पष्ट केले आहे. तुम्ही बँकेत जाऊन कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तुमच्या 2000 रुपयांच्या 10 नोटा एकावेळी बदलून घेऊ शकता. बँक कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या वतीने तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या फीची मागणी करता येणार नाही. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे.

बँक खात्यात किती नोटा जमा करता येतील?

बँक खात्यात 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. तुमच्याकडे असलेल्या सर्व नोटा तुम्ही तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता. बँकिंग नियमांनुसार, तुम्हाला 50,000 किंवा त्याहून अधिक रक्कम ठेवल्यावर पॅन-आधार कार्ड दाखवावे लागेल. याशिवाय पैसे जमा करताना आयकराचे नियम लक्षात ठेवा. जास्त पैसे जमा केल्यावर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस मिळेल.

नोटा बदलण्यासाठी ओळखपत्र द्यावा लागेल का?

पैसे बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र देण्याची गरज नाही. नोटा बदलून घेण्यासाठी ओळखपत्राची गरज नाही, असे आरबीआय गव्हर्नरांनी स्पष्टपणे सांगितले आहे. काही बँकांनी अशा ग्राहकांसाठी ओळखपत्राची तरतूद केली आहे ज्यांचे त्या बँकेत खाते नाही.

30 सप्टेंबरनंतर 2000 च्या नोटांचे काय होईल?

जर तुम्ही 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा जमा करू शकत नसाल तर या नोटा अवैध होतील असे नाही. मात्र त्यानंतर तुमच्या नोटा बँकेत बदलता येणार नाहीत. 30 सप्टेंबरनंतर तुम्हाला नोटा बदलण्यासाठी आरबीआय कार्यालयात जावे लागेल. मात्र, याबाबत आरबीआयकडून कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली नाहीत.

2000 रुपयांची नोट चलनातून बाद झाल्यास अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबत आधीच सांगितले आहे. ते म्हणाले की, 2000 रुपयांची नोट चलनातून बंद केल्यामुळे अर्थव्यवस्थेवर फारच मर्यादित परिणाम होईल. ते म्हणाले की, या नोटा चलनात असलेल्या एकूण चलनाच्या केवळ 10.8 टक्के आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत बहुतांश नोटा परत येण्याची शक्यता आहे.

1000 रुपयांची नोट पुन्हा चलनात येणार?

याबाबत आरबीआय गव्हर्नर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, 1000 रुपयांची नोट पुन्हा चलनात आणण्याचा मुद्दा केवळ अट्टाहास आहे. सध्या तसा कोणताही प्रस्ताव नाही. बँकांनी वृद्ध आणि दिव्यांगांसाठी नोटा बदलून घेण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News: भरधाव पिकअप अनियंत्रित होऊन टेम्पोला धडकला; भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, थरारक VIDEO

Tulsi Vastu Tips: सकाळी तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ काय?

Today's Marathi News Live : महाविकास आघाडीची उद्या सेनाभवनमध्ये संविधान वाचवा सभा

Israel-Hamas War: इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Maharashtra Election: महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच कायम; ठाणे मतदारसंघ कुणाच्या पारड्यात, आज घोषणा होणार?

SCROLL FOR NEXT