Maharashtra Weather Update: ऊन पावसाचा खेळ सुरुच! राज्यात पुढचे 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Maharashtra Unseasonal Rain: विदर्भात पावसाचा जोर जास्त राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Maharashtra Weather Update
Maharashtra Weather UpdateSaam Tv

Maharashtra IMD Alert : एकीकडे महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) जोर कायम आहे. या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकरी संकटात आला आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने (Meteorological Department) पुन्हा एकदा अवकाळी पावासाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. (Latest News)

Maharashtra Weather Update
Buldhana Accident: नागपूर-पुणे महामार्गावर एसटी आणि ट्रक भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 13 जखमी

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर काही ठिकाणी ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भात पावसाचा जोर जास्त राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Breaking News)

विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन देखील हवामान विभागाने केले आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा जेणे करुन नुकसान होणार नाही असे सांगण्यात येत आहे. राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे सावट असल्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे.

दरम्यान, सोमवारी राज्यातील हिंगोली, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. हिंगोलीच्या हिंगोली आणि सेनगाव तालुक्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे भुईमूग, भाजीपाला, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पाऊस झाला. यामुळे कांदा पिंकाचे मोठे नुकसान झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान होणार असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com