Rolls-Royce Accident Saamtv
देश विदेश

Rolls-Royce Accident: १० कोटींची कार, १० मिनिटांत जळून खाक! दिल्ली - मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Tanker Collides with Rolls-Royce in Haryana: धडकेनंतर टँकर उलटला तर आलिशान महागड्या रोल्स रॉयस कारने पेट घेतला.

Gangappa Pujari

Delhi Mumbai Expressway Accident: दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील नगीना पोलिस स्टेशनच्या उमरी गावाजवळ एका डिझेल टँकरने रोल्स-रॉईस कारला धडक दिली. या धडकेनंतर यामुळे टँकर उलटला, तर रोल्स रॉयसने पेट घेतला. या भीषण अपघातात दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर १० कोटी किमतीची रोल्स रॉयस कार जळून खाक झाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील (Delhi- Mumbai Expressway) नगीना पोलिस स्टेशनच्या उमरी गावाजवळ एका डिझेल टँकरने रोल्स-रॉईस कारला धडक दिली. या धडकेनंतर यामुळे टँकर उलटला, तर आलिशान महागड्या रोल्स रॉयस कारने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की काही क्षणात कार पुर्णपणे जळून खाक झाली.

या दुर्घटनेत टँकरचा चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. रोल्स रॉयसमध्ये बसलेल्या महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गाडीची किंमत तब्बल १० कोटी...

दरम्यान, या अपघातात जळालेली कार ही सर्वात महागड्या रोल्स रॉयस कंपनीची होती. Rolls-Royce Phantom VIII असे या गाडीच्या मॉडेलचे नाव असून त्याची भारतीय बाजारात किंमत तब्बल १० कोटी आहे. या भीषण अपघातानंतर दिल्ली- मुंबई महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT