Mla Bacchu Kadu
Mla Bacchu Kadu Saam Tv

Bacchu Kadu News : आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसेल, आम्ही उठलो तर सरकार उठेल; आमदार बच्चू कडू यांचा इशारा

Political News : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून 15 जागा मागणार असल्याचे मत आमदार बच्चू कडू यांनी साताऱ्यात व्यक्त केले आहे.
Published on

Satara News :

महायुतीचे घटकपक्ष असलेल्या प्रहारच्या बच्चू कडू यांनी वेळ पडल्यास स्वबळाची तयारी केली आहे. बच्चू कडू यांनी 15 मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षबांधणी सुरु केल्याची माहितीही दिली होती.

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून 15 जागा मागणार असल्याचे मत आमदार  बच्चू कडू यांनी साताऱ्यात व्यक्त केले आहे. आमचे 10 ते 11 आमदार निवडून येतील आणि आम्ही जिथे बसू तिथे सरकारमध्ये बसतील. आम्ही उठलो तर सरकार उठेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Mla Bacchu Kadu
Maharashtra NCP News: राष्ट्रवादीत चाललंय काय? 'शरद पवारांच्या सभेला गर्दी करा..' प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

महायुतीत अनेक मोठे पक्ष आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीसारखे मोठे पक्ष असताना तुम्हाला एवढ्या जागा महायुतीत मिळतील का? यावर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, त्याचा अभ्यास त्यांनी करावा. (Latest Marathi News)

Mla Bacchu Kadu
Maharashtra Politics: १६ आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गटाकडून वेळकाढूपणा? ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष

स्वबळाचा भूमिका का?

याआधी बच्चू कडू यांनी म्हटलं होतं की, आम्ही युतीमध्ये असलो तरी आमची घरं वेगळी आहेत. त्यामुळे इतरांप्रमाणे आमचं घर मजबूत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजकीय वादळात आमचं घर पडू नये. आमचं घर मजबूत राहावं आणि या घरातून सामान्य नागरिकांची घरं मजबूत राहावी हा आमचा प्रयत्न आहे. (Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com