शुभम देशमुख, प्रतिनिधी...
Bhandara News: पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी बंडखोरांविरोधात दंड थोपटले आहेत. नाशिकच्या सभेनंतर शरद पवारांचा थांबलेला महाराष्ट्र दौरा पुन्हा सुरू झाला आहे. लवकरच ते भंडाऱ्यात सभ घेणार आहेत. तत्पुर्वी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीच त्यांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या सभेला गर्दी करण्याच्या सुचना दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics News)
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल हे पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात पोहोचले. यावेळी त्यांच्या जंगी सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शनाच्या वेळी त्यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) टोला लगावला आणि विविध विषयांना हात घालत शेवटी शरद पवारांची जर सभा झाली तर, त्या सभेला गर्दी झाली पाहिजे म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी सभेला आवर्जून जावे अशाही सूचना यावेळी त्यांनी केल्या.
काय म्हणाले प्रफुल पटेल?
यावेळी बोलताना प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी "शरद पवार आपल्या जिल्ह्यात आले तर, मी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी जाणार आहे. तुम्ही पण या. गर्दी जमवण्यासाठी आपण जावू, त्यांच स्वागत करू असे पटेल यावेळी म्हणाले. तसेच साहेबांच्या सभेला आपल्याशिवाय कोणीही गर्दी करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या सभेला आपण आवर्जून जाऊ. भाषणात माझ्याविरुद्ध बोलले तरी ते ऐकून घेऊ," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.