PM Modi, Rozgar Mela/Twitter SAAM TV
देश विदेश

Rozgar Mela : ५१००० पेक्षा अधिक तरुणांना मिळाली सरकारी नोकरी, PM मोदींनी दिले अपॉइंटमेंट लेटर

Nandkumar Joshi

PM Modi distributes 51000 appointment letters : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज, सोमवारी ५१ हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली. वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ही पत्रे देण्यात आली आहेत. हा रोजगार मेळावा देशभरातील ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी 'रोजगार मेळावा' अंतर्गत तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे दिली. यावेळी त्यांनी तरूणांना संबोधित केले. संपूर्ण देश चांद्रयान ३ च्या यशाचा आनंद लुटत असताना, सरकारी विभागातील नवनियुक्त उमेदवारांना ही नियुक्तीपत्रे देण्यात येत आहेत. अभिमानास्पद क्षणांच्या वेळी तरुणांना मिळालेला हा दुहेरी आनंद आहे, असे ते म्हणाले. (Latest Marathi News)

नोकरीसाठी अर्ज करण्यापासून ते नियुक्तीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. निमलष्करी दलातील भरतीसाठीच्या परीक्षा १३ स्थानिक भाषांमध्ये घेतल्या जात आहेत. या भरतीमुळं सुरक्षाव्यवस्था आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली.

गृहमंत्रालयाकडून विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. सीआरपीएफ (CRPF), बीएसएफ (BSF), एसएसबी (SSB), आसाम रायफल्स, सीआयएसएफ (CISF), आयटीबीपी (ITBP), एनसीबी (NCB) आणि दिल्ली पोलीस (Delhi Police) दलात नियुक्त झालेल्यांना अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले.

आतापर्यंत किती रोजगार मेळावे?

पहिल्यांदा २२ ऑक्टोबर २०२२ रोजी ७५ हजार युवांना रोजगार मेळावा अंतर्गत नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. त्यानंतर २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ७१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली. २० जानेवारी २०२३ रोजी ७१ हजार तरुणांना, तर १३ एप्रिल २०२३ रोजी ७१ हजार, १६ मे रोजी ७१ हजार, १३ जूनला ७० हजार, २२ जुलैला ७० हजार आणि आज, २८ ऑगस्टला ५१ हजार तरुणांना या रोजगार मेळावा अंतर्गत नियुक्तीपत्रे देण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : रायगड पोलीस भरती लेखी परीक्षा कॉपी प्रकरण, दहा जण गजाआड

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Shambhuraj Desai on Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

SCROLL FOR NEXT