कोल्लेगलजवळील रस्ते अपघातात पाच इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा मृत्यू Google
देश विदेश

Accident : कारचा भीषण अपघात; ५ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू

Road Accident Kollegal: मांड्या आणि म्हैसूर येथील पाच अभियांत्रिकी विद्यार्थी एमएम हिल्स येथे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघातात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. कोल्लेगल ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शनिवारी चामराजनगर जिल्हातील कोल्लेगलजवळ जालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय.

मांड्या आणि म्हैसूर येथील पाच अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक गट माले महादेश्वर हिल्स (एमएम हिल्स) येथे 'रथोत्सव' पाहण्यासाठी जात असताना त्यांचा अपघात झाला. कोल्लेगलहून एमएम हिल्सकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावरील चिक्किंदुवाडी गावाजवळ त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाशी जोरदार धडक झाली.

अपघातातील दोन्ही वाहने महामार्गावरून घसरून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पडली. या भीषण अपघातात कारमधील पाचही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलींचा समावेश होता. दरम्यान, मालवाहू वाहनाचा चालक अपघातानंतर वाहन सोडून पळून गेला.

नितीन (२२), सुहास (२१), श्रेयस शेट्टी (२३), श्रीलक्ष्मी (२३) आणि लिखिता (२२) अशी मृतांची नावे आहेत.

स्थानिकांकडून माहिती मिळताच, कोल्लेगल ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्लेगल सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.

कोल्लेगल ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

चामराजनगरच्या पोलिस अधीक्षक बी. टी. कविता आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अपघातस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात न्यायमूर्ती मैदानात, 'SIRमुळे लोकशाहीवर मोठं संकट'

लालचुटूक बीट खाण्याचे १० अद्भूत फायदे, मोजक्याच लोकांना माहीत असतील

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये ऊसदर वाढीसाठी शेतकरी आक्रमक

कोरड्याठाक मराठवाड्यात रोजगारावर संकट, नवरात्रीपूर्वीच शेतमजूरांवर स्थलांतराची वेळ

Rice Manchurian Recipe: उरलेल्या भातापासून घरी बनवा टेस्टी स्पायसी राईस मंचुरियन, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT