तमिळनाडूच्या तिरुवन्नामलाईमध्ये आज सकाळी कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. कार आणि ट्रकची समोरा-समोर धडक झाली. ही धडक इतकी भयानक होती की, या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघातात मृत पावलेले व्यक्ती कोण आहेत कुठले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पण प्राथमिक माहितीनुसार, हे प्रवाशी एका लग्न कार्यक्रमातून परतत होते, त्यावेळी त्यांचा अपघात झाला. (Latest News)
चेंगम पोलीस कर्मचारी या अपघाताचा तपास करत आहेत. पोलिसांनी सर्व मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. या अपघातात ट्रक चालक वाचला. दरम्यान पोलिसांनी या ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या अपघाताचा तपास सुरू केलाय. या कारचा वेग भरधाव धावत होती. त्या दरम्यान कारने चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे हा अपघात झाला. दरम्यान अपघाताचं हे प्रमुख कारण आहे, असं म्हणता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.