PM Narendra Modi in Bihar Siwan  saam tv
देश विदेश

PM Modi Speech : काँग्रेस-आरजेडी डॉ. आंबेडकारांचा फोटो पायाशी ठेवतात, पण मी बाबासाहेबांना हृदयात ठेवतो: मोदी

PM Modi Speech In Siwan, Bihar : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसवर बरसले. बिहारच्या सिवानमध्ये झालेल्या सभेला ते संबोधित करत होते.

Nandkumar Joshi

राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पायाशी ठेवतात आणि मी डॉ. बाबासाहेबांना आपल्या हृदयात ठेवतो, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसवर निशाणा साधला. बिहारमधील जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. सिवान जिल्ह्यातील जसौलीमध्ये त्यांची सभा झाली. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासोबत त्यांनी रोड शो केला. त्यानंतर सभा घेतली. बिहार समृद्ध झाला तर भारत महाशक्ती होईल, असं मोदींनी व्यासपीठावरून ठामपणे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३५ मिनिटांच्या भाषणात आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसवर तुफान हल्ला चढवला. आरजेडी आणि काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असा आरोपही मोदींनी केला. अजूनही बिहारसाठी खूप काही करायचं आहे. गेल्या १० वर्षांत रस्त्यांचे जाळे विणले. दीड कोटी घरांमध्ये नळाचं पाणी पोहोचलं. बिहारच्या शहरांमध्ये नव्याने स्टार्टअप सुरू होत आहेत, असं ते म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे :

गरीबी हटाओच्या घोषणा दशकांपासून ऐकत आहोत. दोन-दोन, तीन-तीन पिढ्या निवडणुकांमध्ये गरीबी हटाओ अशा घोषणा देतात. पण एनडीए सरकारनं दाखवून दिलं की गरीबी कमी होऊ शकते.

गेल्या दशकभरात २५ कोटी भारतीयांनी गरिबीला पराभूत केलं. वर्ल्ड बँकेसारख्या अनेक जागतिक संस्थांनी भारताचं कौतुक केलं. त्यात बिहार आणि येथील नितीश सरकारचं मोठं योगदान आहे. यापूर्वी बिहारचे अर्ध्याहून अधिक लोक गरीब होते. मात्र, गेल्या १० वर्षांत बिहारच्या जनतेनं स्वतःला गरिबीतून मुक्त केलं.

बिहारच्या लोकांनी जंगलराज संपवून टाकलं. इथल्या तरुणांनी २० वर्षांपूर्वीच्या बिहारची अवस्था किस्से आणि गोष्टींमधून ऐकली होती. जंगलराज करणाऱ्यांनी बिहारची काय अवस्था केली होती याचा त्यांना अंदाज नव्हता.

आरजेडीच्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसोबत कसं वर्तन केलं हे सगळ्यांनी बघितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागा, असे बॅनर बिहारमध्ये लागले आहेत. हे लोक कधीच माफी मागणार नाहीत. कारण यांच्या मनात दलित, मागासवर्गीयांबद्दल आदर नाही. आरजेडी आणि काँग्रेसने आंबेडकरांचे फोटो पायाशी ठेवले, पण मोदी बाबासाहेबांना हृदयात ठेवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT