मुस्कान,गोपालीदेवी,रंजू आणि अशा अनेक जणी...या हिंसक का झाल्या ? या महिलांमध्ये हा क्रूरपणा आला कुठून ? आपल्याच नवऱ्याला इतक्या हिंसक पद्धतीनं मारण्याची मानसिकता आली कुठून ? का करतायत नवऱ्यांच्या मृतदेहांचे तुकडे..? एवढ्या पराकोटीचा क्रूरपणा बायकांमध्ये आला कुठून...?
नवरा-बायकोचं नातं हे विश्वासाचं आणि प्रेमाचं...मात्र गेल्या काही दिवसांपासून या नात्याला तडे जाताना थेट शरीराचेच तुकडे पाडले जात असल्याचं वास्तव समोर आलंय.
स्थळ - जयपूर,राजस्थान
महिलेने प्रियकरासह मिळून पतीची निर्घृण हत्या
मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत टाकून जंगलात नेऊन जाळला
स्थळ - मुंबई
महिलेकडून प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पतीची हत्या
स्त्री म्हणजे वात्सल्य,कोमलता,प्रेमळभाव आणि ममत्व....मात्र आपल्याच नवऱ्याचा मृतदेह गोणीत भरताना किंवा ड्रममध्ये भरताना तिच्या मनात नेमक्या काय गोष्टी सुरु असतात, यामागील कारणं काय आहेत समजून घेणं गरजेचंय...म्हणून आम्ही मानसोपचार तज्ञांकडे गेलो..
- व्यक्तिमत्व विकार
- भावनांवर योग्य नियंत्रण न राखता येणं
- संवादा ऐवजी सूड आणि रागाची भावना तीव्र होणं
- विचारशक्ती क्षीण होणं
समाजात चुकीचं काम करण्यासाठी भडकावणाऱ्या व्यक्तीचाही या हत्या प्रकरणात तितकाच सहभाग दिसतो. एखाद्या व्यक्तीला जीवे मारणं हे आपल्या प्रेमासाठी कसं योग्य आहे हे कोणीतरी पटवून देत असतं. प्रेमासाठी ही बाधा दूर करणं गरजेचंच आहे, हे मारणाऱ्या व्यक्तीच्या मनावर बिंबवलं जातं. एका अर्थाने त्याचं पूर्णपणे ब्रेन वॉश केलं जातं.
परिणामी व्यक्ती चुकीचं पाऊल उचलते. मात्र काही वेळेस समाजही अशा घटनांमध्ये तितकाच दोषी असतो. हेच अतुल सुभाष प्रकरणातून समोर आलं होतं..त्यामुळे टोकाचे वाद झाल्यानंतर संवाद करणं,व्यक्त होणं किंवा मानसोपचार तज्ञांची मदत घेणं ही काळाची गरज आहे. तरच समाजाच्या दृष्टीनं अत्यंत घातक असलेल्या अशा घटनांना आळा बसेल...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.