Nika Nikoubin Saam TV
देश विदेश

इराणच्या मेजर जनरलच्या मृत्यूचा बदला; सेक्स करताना प्रियकरावर चाकूनं वार

21 वर्षीय निका निकोबिनवर खुनाच्या प्रयत्नासह अनेक गुन्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृत्तसंस्था

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेतील 21 वर्षीय तरुणीने असे काही केले की ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका महिलेने चाकूने वार करून हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2020 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारल्या गेलेल्या इराणी जनरलच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एका 21 वर्षीय महिलेने हॉटेलच्या खोलीत तिच्या सेक्स दरम्यान जोडीदारावर चाकूने वार केले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

21 वर्षीय निका निकोबिनवर खुनाच्या प्रयत्नासह अनेक गुन्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनीही या प्रकरणाची माहिती गुप्तचर यंत्रणांना दिली आहे. मेल पार्टनरवरती चाकूने चाकूने वार केल्यानंतर निका तिथून पळून गेली. यादरम्यान तिने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना या कृत्याची माहिती दिली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसे या दोघांनी सेक्स करायला सुरुवात केली तसे निकोबिनने दिवे बंद करण्यापूर्वी पीडित मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. काही मिनिटांनंतर, पुरुष जोडीदाराला त्याच्या मानेवर काहीतरी वेदना जाणवू लागल्या, मग तो मोठ्याने ओरडला. त्याला सर्व प्रकार कळताच त्याने मुलीला धक्का देत तात्काळ 911 नंबर डायल केला.

लास वेगास पोलिसांनी सांगितले की, निकोबिन या व्यक्तीला प्लांटी ऑफ फिश या डेटिंग वेबसाइटवर भेटली होती. तिथे ओळख झाल्यानंतर दोघांनी ५ मार्चला हेंडरसनच्या सनसेट स्टेशन हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरवले होते. या हल्ल्याची प्रेरणा तिला एका गाण्यातून मिळाल्याचे निकाने पोलिसांच्या चौकशीत सांगितले.

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणचे जनरल सुलेमानी मारले गेले होते. त्यानंतर ते अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा अमेरिकेने केला होता. या हत्याकांडानंतर इराणने अनेकवेळा अमेरिकेचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. पण या घटनेचा बदला घेण्याच्या नावाखाली निका निकोबिनने असे कृत्य केले यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

SCROLL FOR NEXT