Indore News  Saam TV
देश विदेश

Indore News : 'मां तुझे सलाम' गाण्यावर डान्स करताना निवृत्त जवानाचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Soldier Suffers Heart Attack : "मां तुझे सलाम" गाण्यावर डान्स करत असतानाच एका निवृत्त जवानाचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झालाय. सदर घटनेचा व्हिडिओ देखील उपस्थितांनी आपल्या फोनमध्ये कैद केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मध्य प्रदेशमध्ये काळीज हेलावणारी एक घटना समोर आली आहे. "मां तुझे सलाम" गाण्यावर डान्स करत असतानाच एका निवृत्त जवानाचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झालाय. सदर घटनेचा व्हिडिओ देखील उपस्थितांनी आपल्या फोनमध्ये कैद केला होता. तो व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदौरमध्ये ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इंदौरमध्ये योगा क्लासमध्ये ते एका कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. येथे उपस्थितांसमोर त्यांनी डान्स केला. देशावर प्रेम असल्याने ते "मां तुझे सलाम" या गाण्यावरच स्टेजवर डान्स करत होते.

उपस्थित व्यक्ती देखील त्यांचा डान्स एन्जॉय करत होते. त्यांनी संपूर्ण गाण्यावर छान डान्स केला. ते डान्स करत असताना काही क्षणात मृत्यू त्यांना कवटाळणार आहे अशी कल्पनाही कुणाच्या मनात नव्हती. गाणं संपायला आल्यावर ते अचानक खाली कोसळले.

स्टेजवरच ते पडले तेव्हा सुरुवातीला सर्वांना असे वाटले की, ही डान्समधील एक स्टेप आहे. हातात तिरंगा झेंडा घेऊन ते डान्स करत होते मात्र अचानक चक्कर आल्याने ते स्टेजवर कोसळले. गाणं संपत आल्यानं ही गाण्यातील स्टेप आहे, असं वाटल्याने उपस्थित लोक टाळ्या वाजवत राहिले त्यामुळे त्यांना उचलण्यासाठी पटकन कुणी पुढे आलं नाही.

काही वेळाने घटना लक्षात आल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यापूर्वीच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. सदर घटनेमुळे सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. सोशल मीडियावर देखील या घटनेवर सर्व भारतीय नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentine Day 2026 : लग्नानंतरचा पहिला 'व्हॅलेंटाईन डे' होईल खूपच खास, वाचा 'या' ५ रोमँटिक आयडिया

IND vs NZ: तिसरा वनडे सामना ठरणार निर्णायक; कोण जिंकणार सिरीज? पाहा कशी असेल भारताची प्लेईंग ११

Solapur Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भंयकर अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

BMC Mayor: मुंबईतील जागांचा हट्ट पुरवला, पण भाजपला फटका बसला, शिंदेंना अडीच वर्षाचा महापौर देणार का?

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज,ताकतीने लढण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT