Night Leg Cramps : रात्री झोपेत अचानक पायात गोळा येतोय? 'या' गंभीर आजाराचे आहे संकेत

Shreya Maskar

पायात गोळा येणे

रात्रीच्या वेळी होणारे पायांचे पेटके म्हणजे स्नायूंचे अचानक होणारे वेदनादायी आकुंचन होय. हे सहसा पायाच्या पोटरीत जाणवते.

Leg Cramps | pinterest

समस्या कधी उद्भवते?

ही समस्या विश्रांती घेत असताना किंवा झोपेत असताना उद्भवते. रात्री पायात गोळे येण्यामागील कारणे जाणून घेऊयात.

cramps | pinterest

पाण्याची कमतरता

पुरेसे पाणी न पिणे, जास्त घाम येणे, उष्णतेमध्ये काम केल्यामुळे शरीरातील द्रवांचे संतुलन बिघडते, त्यामुळे स्नायूंमध्ये गोळे येतात.

Dehydration | pinterest

मधुमेह

मधुमेहामुळे नसांना इजा झाल्यास पायात मुंग्या येणे, बधिरपणा, जळजळ, वेदना जाणवतात. काही रुग्णांमध्ये स्नायूंना गोळे येण्याचाही त्रास होतो.

Diabetes | pinterest

किडनीचे आजार

किडनीचे कार्य बिघडल्यास शरीरातील द्रव आणि खनिजांचे संतुलन बदलू शकते. त्यामुळे काही रुग्णांना स्नायूंमध्ये गोळे येऊ शकतात.

Kidney Disease | pinterest

पायांमधील रक्तप्रवाह कमी

पायांच्या धमन्या अरुंद झाल्यास चालताना पोटरीत वेदना होतात. विश्रांती घेतल्यावर वेदना कमी होतात.

Reduced Blood Flow to the Legs | pinterest

स्नायूंवर जास्त ताण येतो

दिवसभर जास्त चालणे, बराच वेळ उभे राहणे, तीव्र व्यायाम करणे किंवा दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे यामुळे रात्री स्नायू आखडू शकतात.

Muscle Strain | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : छातीत दुखत नसतानाही येऊ शकतो हार्ट अटॅक; 'ही' ७ लक्षणे फक्त महिलांमध्येच दिसतात

Women Heart Attack | AI PHOTO
येथे क्लिक करा...