Inflation  SaamTvNews
देश विदेश

Inflation : महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा; किरकोळ महागाई दरात सलग तिसऱ्या महिन्यात घसरण

अन्नधान्य चलनवाढीचा दरही नोव्हेंबरमध्ये घसरला आणि तो 4.67% राहिला. ऑक्टोबरमध्ये अन्नधान्य महागाई 7.01% होती.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : महागाईने पिचलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये 5.88 टक्क्यांवरून 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. सलग 11 महिन्यांनंतर प्रथमच महागाई दर RBI च्या 2-6% च्या निश्चित मर्यादेत आला आहे. अन्नधान्य चलनवाढीचा दरही नोव्हेंबरमध्ये घसरला आणि तो 4.67% राहिला. ऑक्टोबरमध्ये अन्नधान्य महागाई (Inflation) 7.01% होती.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ग्राहक किंमत-आधारित महागाई किंवा किरकोळ महागाई या वर्षीच्या प्रत्येक महिन्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2-6 टक्के लक्ष्याच्या वरच्या लेव्हलवर राहिली आहे. पण नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदाच ते RBI च्या ठरवलेल्या मर्यादेत राहण्यात यशस्वी झाले आहे. किरकोळ महागाई दर दोन ते सहा टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याची जबाबदारी आरबीआयकडे आहे. (Latest Marathi News)

वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात सातत्याने वाढ केली होती, त्यामुळे बँकेकडून कर्ज घेणे महाग झाले आहे. रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत रेपो दरात 225 बेसिस पॉईंटची वाढ केली असून तो 6.25% वर नेला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेतील ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI) बास्केटमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतींचा वाटा सुमारे 40% आहे.

किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारीपासून मध्यवर्ती बँकेच्या सहा टक्क्यांच्या मर्यादेच्या वर राहिला आहे. आता तो 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. डिसेंबर 2021 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 5.66 टक्के होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pastry: ओव्हनची काय गरज कुकरमध्येच बनवा टेस्टी न्यू इयर स्पेशल पेस्ट्री केक, वाचा सोपी रेसिपी

Bajrang Dal Vandalism Mall: बजरंग दलाच्या ३०-४० कार्यकर्त्यांचा राडा; धर्म विचारून रायपुरच्या मॅग्नेटो मॉलमध्ये तोडफोड

Old Is Gold उमेदवारीचा भाजपचा फाॅर्म्युला ठरला, त्या नगरसेवकांना पुन्हा संधी|VIDEO

Karjat Tourism : ट्रेकिंग अन् हायकिंगसाठी कर्जतजवळील भन्नाट लोकेशन, न्यू इयर वीकेंड 'येथे' प्लान करा

Shocking: कुत्र्याची हत्या, सशाचे मटण सांगून गावभर विकले; खाताच गावकऱ्यांची प्रकृती खालावली, तरुणाने असं का केलं?

SCROLL FOR NEXT