India-china Border: भारत-चीन सैनिकांमध्ये झटापट, दोन्ही देशांचे सैनिक जखमी

दोन्ही बाजूने झालेल्या या झटापटीत एकूण 30 जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
India China
India ChinaSaam Tv
Published On

India-China Border: भारत आणि चीन सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. 9 डिसेंबरला घटना घडली आहे. तवांगजवळ ही झटापट झाल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही बाजूने झालेल्या या झटापटीत एकूण 30 जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. (India China)

भारतीय जवानांनी चीनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराच्या अधिकृत वक्तव्याची आता प्रतीक्षा आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये अरुणाचल प्रदेशातील यांगसे येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता.

India China
Punjab : गव्हाच्या पोत्याची चोरी रंगेहाथ पकडली; ट्रक चालकाने चोराला दिली क्रूर शिक्षा, Video Viral

अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनचे सैनिक समोरासमोर आल्याची माहिती आहे. तवांग जिल्ह्यातील यंगस्टे येथे ही घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 9 डिसेंबर 2022 ची आहे. (Latest Marathi News)

रिपोर्ट्सनुसार, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी एलएसीपर्यंत पोहोचली होती. चिनी सैनिकांच्या या कारवाईला भारतीय जवानांनी कडाडून विरोध केला. यादरम्यान दोन्ही सैन्यांमध्ये चकमक झाल्याचेही वृत्त आहे. या चकमकीत दोन्ही लष्कराचे काही जवान जखमी झाले.

India China
Kabul Attack: अफगाणिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरलं, चीनी हॉटेल लक्ष्य; मुंबईवरील 26/11 हल्ल्याची झाली आठवण

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांचे सैनिक काही वेळातच घटनास्थळावरून मागे हटले. या घटनेनंतर भारतीय लष्कराचे कमांडर आणि चिनी कमांडर यांनी प्रक्रियेनुसार फ्लॅग मीटिंग घेतली. जेणेकरून परिसरात शांतता प्रस्थापित करता येईल.

गलवान हल्ल्यात 20 जवान शहीद

15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले आणि अनेक जण जखमी झाले. या चकमकीत चीनचे अनेक सैनिकही मारले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com