hotel service charge  saam tv
देश विदेश

ग्राहकांना मोठा दिलासा; आता रेस्टॉरंटच्या बिलातील सर्व्हिस चार्ज देणे बंधनकारक नाही

ग्राहक सेवा शुल्कावरून अनेक वाद समोर आले होते. त्यानंतर राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने निर्देशानंतर हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहक सेवा शुल्क आकारण्यावर बंदी घातली आहे

Vishal Gangurde

नवी दिल्ली : रेस्टॉरंटच्या बिलातील ग्राहक सेवा शुल्कासंबंधित नवीन माहिती समोर आली आहे. आता रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्ज (Service Charge) हा इतर कोणत्याही नावाने वसूल केला जाऊ शकत नाही. ग्राहक सेवा शुल्क हा जेवण्याचा बिलामध्ये जोडला जाऊ शकत नाही. तसेच ग्राहक सेवा शुल्कावर जीएसटी देखील आकारला जाऊ शकत नाही. ग्राहक सेवा शुल्कावरून अनेक वाद समोर आले होते. त्यानंतर राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या निर्देशानंतर हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहक सेवा शुल्क आकारण्यावर बंदी घातली आहे. ( Hotel restaurants service Charge News In Marathi )

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या आदेशात म्हटले आहे की, हॉटेल (Hotel) आणि रेस्टॉरंटच्या बिलात ग्राहक सेवा शुल्क जोडता येणार नाही. ग्राहक सेवा शुल्कावर जीएसटी देखील आकारला जाऊ शकत नाही. मात्र काही हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहक सेवा शुल्क वसूल केला जात होता. त्यामुळे यासंबंधित अनेक तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने रेस्टॉरंट मालकांना ग्राहक सेवा शुल्क आकारण्यावर बंदी घातली आहे. रेस्टॉरंट किंवा हॉटेलकडून ग्राहक सेवा शुल्क आकारल्यास त्या विरोधात १९१५ या क्रमांकावर तक्रार देखील करता येणार आहे.

ग्राहक सेवा शुल्क काय असतो ?

ग्राहक कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यास त्याच्या बदल्यात पैसे मोजावे लागतात. त्याला ग्राहक सेवा शुल्क म्हणतात. याच प्रकारचा ग्राहक सेवा शुल्क हा रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये देखील आकारला जातो. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाणारे अनेक ग्राहक न विचारता ग्राहक सेवा शुल्क देतात.

किती ग्राहक सेवा शुल्क आकारला जातो ?

ग्राहक सेवा शुल्क हा हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या बिलामध्ये सर्वात खाली लिहिला जातो. ग्राहक सेवा शुल्क हा ५ टक्के आकारला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT