AIIMS Doctor End life Saam Tv
देश विदेश

Shocking: डॉक्टरच्या निधनाने खळबळ, रुग्णालयातील बाथरुमध्ये आढळला मृतदेह

AIIMS Doctor Death: राजस्थानच्या जोधपूरमधील एम्स रुग्णालयातील डॉक्टरने आत्महत्या केली. रुग्णालयातील बाथरुममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.

Priya More
  • एम्स जोधपूरच्या निवासी डॉक्टरचा मृत्यू

  • जोधपूर एम्स रुग्णालयातील बाथरुममध्ये डॉक्टरचा मृतदेह आढळला

  • डॉ. राज नरेश यादव यांच्या मृत्यूचा पोलिसांकडून तपास

  • एम्स जोधपूरमधील निवासी डॉक्टरच्या मृत्यूने खळबळ

  • जोधपूर पोलिसांचा तपास सुरू

राजस्थानच्या जोधपूरमध्ये डॉक्टरने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. जोधपूरच्या एम्स रुग्णालयातील निवासी डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलले. राज नरेश यादव असं या आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव होते. ते अलवरचे रहिवासी होते. त्यांनी इंजेक्शन घेत आयुष्य संपवलं. या घटनेचा तपास सध्या जोधपूर पोलिस करत आहेत. डॉक्टरच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नाही.

आत्महत्येची माहिती मिळताच एम्सने तात्काळ पोलिसांना कळवले. बसनी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डॉक्टरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी डॉक्टरच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, अलवरचे रहिवासी आणि एम्सच्या भूलशास्त्र विभागातील प्रथम वर्षाचे निवासी डॉक्टरने आत्महत्या केली. डॉ. राज नरेश यादव(३१ वर्षे) हे मंगळवारी ऑपरेशन थिएटरमध्ये ड्युटीवर होते.

डॉक्टर राज दुपारच्या वेळी ऑपरेशन थिएटरमधून बाहेर गेले. जवळपास दीड तास झाले तरी ते परत आले नाही. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना फोन केला पण त्यांनी उचलला नाही. काळजी वाटू लागली म्हणून त्यांनी त्यांचा शोध घेतला. डॉक्टर राज यांच्या शोधात त्यांचे सहकारी डॉक्टर मित्र ऑपरेशन थिएटरच्या विश्रांती कक्षात केले. त्याठिकाणच्या बाथरूमचा दरवाजा बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजवून देखील डॉक्टर राज आतून उत्तर देत नव्हते. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी बाथरुमचा दरवाजा तोडला. आतमधील चित्र पाहून ते घाबरले. डॉ. राज बेशुद्ध अवस्थेत खाली पडले होते. त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी त्यांना सीपीआर दिला आणि आपत्कालीन उपचार करण्याचा प्रयत्नन केला. पण तोपर्यंत डॉक्टरचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासातून असे दिसते की डॉक्टरक राज नरेशने स्वतःला इंजेक्शन टोचून आत्महत्या केली आहे. इंजेक्शनचा नेमका प्रकार अद्याप कळलेला नाही. शवविच्छेदनानंतरच संपूर्ण तपशील समोर येईल. एम्सने या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. डॉक्टर राज हे बऱ्याच कालावधीनंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत होते.

डॉ. राज नरेश यादव यांनी एम्स जोधपूर येथून एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर ते दिल्लीला गेले आणि सुमारे ४-५ वर्षांच्या कालावधीनंतर त्यांनी पदव्युत्तर परीक्षा दिली. गेल्या वर्षी, त्यांना एम्स जोधपूर येथील भूलशास्त्र विभागात प्रवेश मिळाला. हे त्यांच्या निवासी प्रशिक्षणाचे पहिलेच वर्ष होते आणि आतापर्यंत कोणत्याही दबावाचे किंवा समस्यांचे अधिकृत अहवाल प्रसिद्ध झालेले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Prabhari list: भाजपने भाकरी फिरवली! पक्षात मोठा फेरबदल; महाराष्ट्रातील ४ नेत्यांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

LPG eKYC : LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! e-KYC केली नाही तर होणार आर्थिक नुकसान, जाणून घ्या नवा नियम

Diabetes drink: हे तीन घटक एकत्र उकळून प्या; डायबेटीस रूग्णांची वाढलेली साखर झटक्यात येईल कमी

Coffee Health Tips: दिवसातून किती कप कॉफी प्यावी? जास्त कॉफी प्यायल्याने शरीरावर होऊ शकतात 'हे' ७ परिणाम

Maharashtra News Live Update: “जीआर-एफआर काढण्यापेक्षा प्रति हेक्टरी किती मदत जाहीर करता?”; अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT