HIV News  Saam Tv
देश विदेश

HIV विरोधात तज्ज्ञांना मोठं यश; मुळापासून आजारावर मात करता येणार

HIV Treatment Research : HIV विरोधात अथक प्रयत्न केल्यानंतर तज्ज्ञांना मोठं यश आलं आहे. 'एचआयव्ही'वर मुळापासून उपचार मिळविण्यासाठी नवा उपाय शोधला आहे. एचआयव्ही एक गंभीर आजार आहे.

Vishal Gangurde

HIV Treatment News :

HIV विरोधात अथक प्रयत्न केल्यानंतर तज्ज्ञांना मोठं यश आलं आहे. 'एचआयव्ही'वर मुळापासून उपचार मिळविण्यासाठी नवा उपाय शोधला आहे. एचआयव्ही एक गंभीर आजार आहे. एचआयव्ही आजारामुळे इम्यून सिस्टम खराब होते. एचआयव्ही हा जीवेघणा आजार आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, एचआयव्ही आजारावर उपाय शोधण्याचा कारनामा एम्सटर्डम विश्वविद्यालयाच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. शास्त्रज्ञांनी CRISPR या नावाची टेक्निक वापरून एचआयव्हीवर उपाय मिळविण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे. या टेक्निकला मॉलिक्यूलर सीजर या नावाने ओळखलं जातं.

सध्या एचआयव्ही आजारावर फक्त नियंत्रण मिळविण्यास यश मिळत होतं. मात्र, या आजारावर मुळापासून सुटका मिळत नव्हती. आता या आजारापासून सुटका मिळविण्यासाठी वैद्यकीय शास्त्रज्ञांनी उपाय शोधला आहे. याबाबत एम्सटर्डम विश्वविद्यालयाच्या वैद्यकीय शास्त्रज्ञांनी मेडिकल परिषद घेऊन माहिती दिली. मात्र, संशोधनाच्या माध्यमातून कोणताही तातडीने उपचार केला जाणार नाही. यावर आणखी संशोधन करण्यात येत आहे. संशोधन किती प्रमाणात उपयोगी आहे, याबाबत लवकरच माहिती मिळणार आहे.

नॉटिंघम विश्वविद्यालयामध्ये स्टेम सेल आणि जीन थेरेपी टेक्नोलॉजीचे सहायक प्राध्यापक डॉ. जेम्स डिक्सन यांचं या संशोधनावर म्हणणं आहे की, 'एचआयव्हीवर CRISPR चा उपयोग किती होतो, यासाठी पुन्हा एकदा मूल्यांकन करावं लागेल'.

डॉक्टर डिक्सन पुढे म्हणाले की, 'स्टडी जीन एडिटिंग टेक्निकचा एचआयव्हीच्या विषाणूवर मुळापासून मात करण्याचा प्रयत्न करते. या संशोधनावर अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. माणसाच्या शरीरावर याचा काय परिणाम होतो, हे पाहावे लागेल',

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT