Rohini Gudaghe
दही आणि भातामध्ये फॅट आणि कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे दही भात खाल्ल्याने वजन नियंत्रित राहतं.
कर्ड-राईसमध्ये कॅलशियम आणि प्रोबॉयोटीक्ससारख्या बॅक्टेरियाचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे शरीराचे आरोग्य निरोगी राहते आणि पचनशक्ती चांगली राहते.
कर्ड राईसच्या आहारात समावेश केल्यामुळे मेटाबॉलिज्म अर्थात चयापचय क्रिया सुधारण्यास मदत मिळते. त्यामुळे वजन कमी आणि शरीर तंदुरुस्त राहते.
दही आणि भातामध्ये आयर्न आणि मॅग्नेशियमसारखे भरपूर पोषणतत्व असतात. त्यामुळे शरीरातील उच्चरक्तदाबाची समस्या असणाऱ्यांना फायदे मिळतात.
दही आणि भातामुळे शरीरात थंडावा राहण्यास मदत मिळू शकते.
दही आणि भाताचा आहारात समावेश केल्यामुळे शरीर एनर्जेटिक राहण्यास मदत मिळते. याशिवाय कडक उन्हामध्येही शरीर दीर्घकाळ क्रियाशील राहते.
दह्यामध्ये प्रोबॉयोटिक्स अँटिऑक्सीडेंट आणि आवश्यक फॅट्स असतात.यामुळे मेंदूला तणाव आणि वेदना निर्माण करणाऱ्या भावनांचा सामना करण्यासाठी मदत मिळते.
आहारात नियमितपणे कर्ड राईसचा समावेश केल्यास प्रतिकारशक्ती वाढते.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
NEXT: यंदा होळीला घरच्या घरी तयार करा फुलांनी रंग