Republic Day Special Saam Digital
देश विदेश

Republic Day Special: शत्रूला भनकही न लागता 'टायगर शार्क' करणार काम तमाम; 26 जानेवारीला दाखवणार ताकद, मुंबईचं आहे कनेक्शन

Republic Day Special News: यंदाचा प्रजासत्ताक दिन अनेक अर्थांनी खास असणार आहे. सामर्थ्य आणि उभरती अर्थव्यवस्थेची झलक पहायला मिळणार आहे. दरम्यान २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात भारतातील सर्वात आधुनिक पाणबुडी कलवरी देखील दिसणार आहे.

Sandeep Gawade

Republic Day Special

यंदाचा प्रजासत्ताक दिन अनेक अर्थांनी खास असणार आहे. सामर्थ्य आणि उभरती अर्थव्यवस्थेची झलक पहायला मिळणार आहे. दरम्यान २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात भारतातील सर्वात आधुनिक पाणबुडी देखील दिसणार आहे. ही पाणबुडी अतिशय शांत आणि शत्रूला कसलीही चाहुल न लागता हिंदी महासागरात अतिशय शांतपणे काम करत असते. कलवरी क्लासची ही पाणबुडी भारतातील सर्वात आधुनिक पाणबुडी असून डिझेल आणि विजेवर चालते. ही पाणबुडी फ्रान्सच्या तांत्रिक मदतीने मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे तयार करण्यात आली आहे.

कलवरी वर्गाच्या अशा 6 पाणबुड्या भारतीय नौदलात समाविष्ट केल्या जाणार आहेत. सध्या या वर्गातील पाच पाणबुड्या नौदलात सामील झाल्या असून सहावी पाणबुडीही काही दिवसांत नौदलात सामील होणार आहे. या वर्गातील पहिल्या पाणबुडीचे नाव कलवरी आहे. कलवरीला टायगर शार्क देखील म्हटलं जातं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कलवरी पाणबुडी सुमारे 67 मीटर लांब आणि 21 मीटर उंच आहे. तर वजन सुमारे दीड हजार टन आहे. टायगर शार्क पाण्याच्या वर ताशी 20 किलोमीटर आणि पाण्याखाली 37 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकते. शत्रूला पराभूत करणारी ही पाणबुडी ५० दिवस पाण्याखाली राहू शकते. टायगर शार्क अनेक प्रकारच्या जोखमीच्या मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास सक्षम आहे.

खोल समुद्रात हल्ला करणे आणि पाळत ठेवण्याची क्षमता टायगर शार्कमध्ये आहे. समुद्रात भूसुरुंगही टाकू शकते. टॉर्पेडो आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली ही पाणबुडी अगदी युद्धनौकाही नष्ट करण्यास सक्षम आहे. शत्रूच्या नजरेपासून लपून हल्ला करण्यात माहिर असल्याने या वर्गात पाणबुड्यांना सँड शार्क असेही म्हणतात. अथांग हिंदी महासागरावर टायगर शार्कची नजर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT