India Gate Bharat Mata Dwar Saam Tv
देश विदेश

India Gate : इंडिया गेटचं नाव बदलून 'भारत माता द्वार' करा, भाजपा नेत्याची पंतप्रधान मोदींकडे विनंती

India Gate Bharat Mata Dwar : भारतीय जनता पक्षातील अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी इंडिया गेटचे नाव बदलून 'भारत माता द्वार' असे ठेवावे अशी विनंती केली आहे.

Yash Shirke

India Gate : भारतीय जनता पक्षातील अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी इंडिया गेटचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहत ही मागणी केली. त्यांनी इंडिया गेटचे नाव बदलून भारत माता द्वार करा असे पत्रामध्ये म्हटले आहे. हे नामकरण भारतातील शहीदांना योग्य श्रद्धांजली असेल असा मजकूर पत्रात आहे.

जमाल सिद्दीकी यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रामध्ये लिहिलेल्या मजकुरामध्ये 'आपण औरंगजेबाचे नाव असलेल्या रस्त्याचे नाव ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड असे ठेवले. इंडिया गेटवरील किंग जॉर्ज पंचमची मूर्ती हटवून त्याजागी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारला. राजपथाचे नाव बदलून कर्तव्य पथ असे नाव दिले. याच प्रकारे इंडिया गेटचे नाव बदलून भारत माता द्वार करावे अशी मी विनंती करतो', असे नमूद केले आहे.

इंडिया गेटच्या नामांतराने हजारो शहीद देशभक्तांना सच्ची श्रद्धांजली मिळेल. ज्यांनी ज्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले त्यांच्या बलिदानाचा सन्मान होईल', असेही जमाल सिद्धीकी यांनी म्हटले आहे. त्यांच्या मागणीवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नवी दिल्लीतील कर्तव्य पथाजवळ इंडिया गेट हे पहिल्या महायुद्धात भारतीय सैन्यादलातील जवानांच्या बलिदानाचा सन्मान करणारे युद्ध स्मारक आहे. सर एडविन लुटियन्स यांच्या कल्पनेतून ही भव्य रचना तयार करण्यात आली होती. रोममधील आर्क ऑफ कॉन्स्टंटाइन सारख्या प्राचीन रोमन विजयी कमानींपासून प्रेरणा घेत इंडिया गेटची वास्तू उभारण्यात आली आहे असे म्हटले जाते.

दिल्लीत राजपथाचे नाव बदलून मार्गाला कर्तव्यपथ असे नाव देण्यात आले आहे. मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉलचे नाव बदलण्यात आले होते. दरबार हॉलचे नाव 'गणतंत्र मंडप' तर अशोक हॉलचे नाव 'अशोक मंडप' असे करण्यात आले. या सभागृहांचा उपयोग विविध औपचारिक कार्यक्रमांसाठी केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT