रिलायन्सचा जिओफोन नेक्स्ट लवकरच बाजारात येणार, किंमत असेल स्वस्त Saam Tv
देश विदेश

रिलायन्सचा 'जिओफोन नेक्स्ट' लवकरच बाजारात येणार, किंमत असेल स्वस्त !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जिओफोन नेक्स्टची JIoPhone Next घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली. गुगलच्या Google सोबतीने विकसित करण्यात आलेला हा फोन 'मोस्ट अफोर्डेबल' परवडण्याजोगा असेल, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केले आहे. Reliances Jiophone Next to hit the market soon

हे देखील पहा-

यावेळी ते म्हणाले की, " आम्ही जिओ फोन देशातील डिजिटल डिव्हाईड म्हणजेच तंत्रज्ञानातील गरीब आणि श्रीमंतीची दरी मिटवण्यासाठी घेऊन आलो होतो. आता गुगलसोबत मिळून जिओ एक स्वस्त स्मार्टफोन Smartphone घेऊन येत आहे. ज्याचे नाव असेल जिओफोन नेक्स्ट. या फोनमध्ये सुद्धा जिओ आणि गुगलचे सगळे अॅप्लिकेशन्स Applications उपलब्ध असतील."

या फोनमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम OS असेल. तसेच 10 सप्टेंबरपासून हा फोन उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले.

रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमधील प्रमुख मुद्दे-

पुढच्या ३ वर्षांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज नवीन ऊर्जा Reliance New Energy Council उद्योगामध्ये १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. यासाठी ५००० एकरांवर 'ग्रीन एनर्जी गिगा कॉम्प्लेक्स'ची स्थापना करण्यात येणार आहे.

१५ अब्ज डॉलर्सचा करार गेल्या काही काळापासून चर्चेत असलेला सौदी अरामकोसोबतचा यावर्षी नक्की होईल. यानंतर रियायन्स इंडस्ट्रीच्या संचालक मंडळात सौदी अरामकोचे अध्यक्ष आणि यासिर अल-रुमाय्यान हे स्वतंत्र संचालक म्हणून सहभागी होतील.

गेल्या काही वर्षांत जिओ फायबरने २० लाखांहून अधिक नवीन परिसरापर्यंत पोहोचले आहे. जिओ फायबर ३० लाख वापरकर्त्यांसह हे देशातील सर्वाधिक मोठं आणि वेगानं वाढणारे ब्रॉडबॅण्ड ऑपरेटर ठरले आहे.

नीता अंबानी Nita Ambani रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक यावेळी म्हणाल्या, "रिलायन्सने कर्मचाऱ्यांसाठी राबवलेली लसीकरणाची मोहीम Vaccination Drive ही देशातील सगळ्यात मोठी कॉर्पोरेट लसीकरण मोहीम होती. यात २० लाखांहून अधिक कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत लसीकरण करण्यात आले होते. ."

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT