Reliance JioBook Photo Saam TV
देश विदेश

Jio Laptop: रिलायन्स जियो मोठा धमाका करण्याच्या तयारीत; फक्त 15 हजारात मिळणार कड्डक 4G लॅपटॉप

Reliance JioBook Latest News: जियोने याअगोदर देशातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन बाजारात आणला होता, ज्याला ग्राहकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Jio Laptop News: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त लॅपटॉप (Laptop) आणण्याच्या तयारीत आहे. जियोबुक (JioBook) असं या लॅपटॉपचं नाव असून अवघ्या १५ हजार रुपयांत हा लॅपटॉप ग्राहकांना मिळू शकतो. जियोने याअगोदर देशातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन बाजारात आणला होता, ज्याला ग्राहकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता लॅपटॉप सेगमेंटमध्येही धमाका करण्यासाठी जियो तयारी करत आहे. विशेष म्हणजे जियोचा हा लॅपटॉप 4G असणार आहे, म्हणजे 4G नेटवर्क वापरुन फास्ट इंटरनेटचा आनंद यात घेता येणार आहे. (Reliance Jio Laptop News)

या लॅपटॉपबाबत कंपनीकडून फारशी माहीती सध्या देण्यात आलेली नाही, पण काही टेक साईट्सने याबाबत दावा केला आहे की रिलायन्स जियो या कंपनीने JioBookसाठी Qualcomm आणि Microsoft सोबत करार केला आहे. क्वालकॉम कंपनी जियोच्या लॅपटॉपसाठी आर्म लिमिटेडच्या तंत्रज्ञानातून तयार केलेला चिपसेट उपलब्ध करून देईल. त्याचबरोबर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम बनवणारी मायक्रोसॉफ्ट अॅप सपोर्ट देणार आहे. स्वस्त 4G JioPhone च्या धर्तीवर कंपनी हा लॅपटॉप लॉन्च करणार आहे. टॅबलेटला पर्याय म्हणून जिओ आपला लॅपटॉप बाजारात आहे. मात्र जिओने या लॅपटॉपवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रिलायन्स जिओचे भारतात ४२ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. गुगलच्या सहकार्याने जियो लवकरच 5G स्मार्टफोनही लॉन्च करणार आहे. (Best Laptop In Lowest Price)

या लॅपटॉपमध्ये जिओची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम JioOS इन्स्टॉल असणार आहे, आणि त्यात JioStore वरून अॅप्स डाउनलोड करता येतील. जिओ अशा कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना टार्गेट करत आहे जे सध्या घरून काम करत आहेत. अशा लोकांसाठी जिओचा लॅपटॉप टॅब्लेटचा पर्याय बनू शकतो. Jio ने 2020 मध्ये KKR & Co Inc आणि सिल्व्हर लेक सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांकडून सुमारे $22 बिलियन जमा केले होते. 2016 मध्ये कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात दबदबा निर्माण केली होती. रिसर्च फर्म IDC च्या मते, गेल्या वर्षी भारतात लॅपटाप शिपमेंट 14.8 दशलक्ष युनिट होते. यामध्ये HP, Dell आणि Lenovo यांचा मोठा वाटा होता. आता जियो आपले स्वस्त लॅपटॉप बाजारात आणून या कंपन्यांना आवाहन देणार आहे. (Tech News In Marathi)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT