विशेष लिंबासाठी विक्रमी बोली Google
देश विदेश

Tamil Nadu Lemon: अबब... चक्क १३ हजार रुपयांना विकला गेला एक लिंबू, काय आहे खास वैशिष्ट्य?

Erode: तामिळनाडूमध्ये एका लिंबाचा लिलाव १३,००० रुपयांना झाला आहे. हा लिंबू धार्मिक कारणांसाठी वापरण्यात येतो. त्याला विशेष महत्त्व असून ते देवता व पूजाविधींसाठी वापरले जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात एका लिंबाचा तब्बल १३,००० रुपयांना लिलाव करण्यात आला आहे. इरोडमधील एका गावातील मंदिरात विशेष विधीमध्ये हे लिंबू वापरले जात होते. मंदिर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा लिलाव शुक्रवारी मध्यरात्री सार्वजनिकरित्या पार पडला, आणि एका खरेदीदाराने हे लिंबू १३,००० रुपयांना खरेदी केले.

याशिवाय, चांदीची अंगठी आणि चांदीच्या नाण्यांचा देखील लिलाव झाला, ज्यावर बोली लावण्यात आली. तामिळनाडूतील विविध मंदिरांमध्ये अशाप्रकारचे लिलाव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने पार पडतात. धार्मिक विधींमध्ये वापरली जाणारी फळं आणि अन्य पूजासामग्री भक्त मोठ्या किमतीत खरेदी करतात, कारण त्यांचा विश्वास असतो की यामुळे शुभ फलप्राप्ती आणि आशीर्वाद मिळतो.

चांदीची अंगठी ४३,१०० रुपयांना खरेदी केली

महाशिवरात्री उत्सवानिमित्त अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार, विलाक्केठी गावातील पझमथिन्नी करुप्पा ईश्वरन मंदिरात बुधवारी मध्यरात्री सार्वजनिक लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावाच्या निमित्ताने, भाविकांनी मुख्य देवतेच्या मूर्तीवर लावलेल्या पवित्र वस्तूंसाठी बोली लावली, ज्यामध्ये एक लिंबू , एक चांदीची अंगठी आणि एक चांदीचे नाणे यांचा समावेश आहे . थंगराज नावाच्या एका व्यक्तीने १३,००० रुपयांना लिंबू खरेदी केले, तर अरचलूर येथील चिदंबरम यांनी ४३,१०० रुपयांना चांदीची अंगठी खरेदी केली.

गेल्या वर्षी ९ लिंबू २.३६ लाख रुपयांना विकले गेले होते

लिलावादरम्यान, रविकुमार आणि बानुप्रिया यांनी संयुक्तपणे चांदीच्या नाण्यासाठी ३५ हजार रुपयांची बोली लावली. मंदिर अधिकाऱ्यांनी सांगितले की, लिलावानंतर, वस्तू विशेष पूजेसाठी देवासमोर ठेवण्यात आल्या. भाविकांचा असा विश्वास आहे की या वस्तू ठेवल्याने त्यांच्या कुटुंबात समृद्धी येते. गेल्या वर्षी तामिळनाडूच्या विलुप्पुरम जिल्ह्यातील भगवान मुरुगनच्या मंदिरात अर्पण केलेल्या ९ लिंबूंचा लिलाव २.३६ लाख रुपयांना झाला होता. यापैकी एक लिंबू खरेदीदाराने ५०,५०० रुपये देऊन खरेदी केला.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT