सुदानच्या सैन्य दलाविरोधात लढणाऱ्या निमलष्करी समुहाने कहरच केला आहे. बंडखोर निमलष्करी समुहाने सुदानच्या ओमदुरमन शहरातील बाजारात खुलेआम गोळीबार केला. या गोळीबारात ५४ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. सुदानमधील आरोग्य मंत्रालयाने म्हटलं की, सबरीन मार्केटमधील गोळीबारात १५८ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेने देशात खळबळ उडाली आहे.
अफ्रिकी देशात गृहयुद्ध वाढल्याचं दिसत आहे. सुदानमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेविषयी आरेसएफकडून कोणतीही अधिकृत टिप्पणी आलेली नाही. सुदान सरकारचे प्रवक्ते खालिद अल-अलीसर यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यातील मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यात निमलष्करी समुहाने खासगी आणि सार्वजनिक संपत्तीची नासधूस केली आहे.
सुदानमधील डॉक्टर सिडिंकेडने आरएसएफच्या हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी म्हटलं की, 'एक बॉम्बचा रुग्णालयाच्या काही अंतरावर स्फोट झाला. बाजारात झालेल्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात आणलेल्या गेल्या मृतदेहांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे. सध्या रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.
सुदानचा हा देशाअंतर्गत संघर्ष एप्रिल २०२३ साली सुरु झाला होता. सुदानचं सैन्य दल आणि त्यांच्या निमलष्करी प्रमुखांमध्ये झालेल्या वादानंतर खुलं युद्ध पेटलं. मागील आठवड्यात झालेल्या हल्ल्यात ७० लोकांचा मृत्यू झाला होता. संघर्षात आतापर्तंत २८००० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
सुदानमधील संघर्षात आतापर्यंत आतापर्यंत २८००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धामुळे बहुतांश लोक घर सोडून दुसऱ्या देशात वास्तव्यास गेले आहेत. दुसऱ्या देशात स्थलांतरित झालेले लोक मिळेल ते खाऊन दिवस काढत आहेत. या युद्धात हत्या आणि बलात्काराच्या अनेक घटना घडल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.