Shraddha Walkar Saam TV
देश विदेश

Shraddha Walkar : श्रद्धा-आफताबमध्ये शेवटच्या भांडणाचं कारण होतं, मुंबईला सामान आणायला कोण जाणार?

आफताबने यापूर्वीही तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय असून त्याची चौकशी सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलीस चौकशीत रोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आफताब पूनावाला याने 18 मे रोजी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि 2-3 महिन्यांच्या कालावधीत त्याची विल्हेवाट लावली. गुन्ह्यापूर्वी त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. (Crime News)

खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब पूनावाला आणि श्रद्धा हे दोघेही शेवटच्या क्षणी त्यांच्या मुंबईतील घरातून सामान दिल्लीला आणण्यासाठी मुंबईला कोण जाणार यावर वाद घालत होते. दोघांनाही मुंबईला जाणं परवडणारं नव्हतं, कारण त्यावेळी दोघांना पैशांची कमतरता भासत होती.  (Latest News Update)

पोलीस आज आफताबला साकेत न्यायालयात हजर करणार

पोलिसांनी सांगितले की, श्रद्धाचा फोन आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार अद्याप जप्त करण्यात आलेले नाही. आफताबने यापूर्वीही तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय असून त्याची चौकशी सुरू आहे. पूनावाला याला गुरुवारी साकेत न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस त्याची कोठडी मागणार आहेत. चौकशीदरम्यान त्याच्यामध्ये पश्चातापाची कोणतीही चिन्हे दिसली नसल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

साकेत कोर्टाने दिली नार्को टेस्टला मंजुरी

तत्पूर्वी, दिल्लीच्या साकेत कोर्टानं श्रद्धा प्रकरणातील आरोपी आफताबच्या नार्को टेस्टला मंजुरी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी नार्को टेस्टची परवानगी मागितली होती. आफताब हा पोलीस चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न होता, असेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दिल्लीच्या महरौलीमध्ये झाले होते शिफ्ट

आफताब आणि श्रद्धा वालकर हे दोघे मे मध्ये दिल्लीच्या महरौलीमध्ये एका फ्लॅटमध्ये राहायला गेले होते. त्यानंतर दोघांमध्ये १८ मे रोजी भांडण झाले होते. आफताबने गळा आवळून तिची हत्या केली होती. त्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. आफताबने शरीराचे केलेले तुकडे ठेवण्यासाठी ३०० लीटरच्या फ्रीजचा वापर केला. फ्रिजमधील एकेक तुकडा काढून तो जंगलात फेकून देत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, श्रद्धाच्या हत्येनंतर अन्य महिला त्याच्या फ्लॅटवर यायची तेव्हा तो मृतदेहाचे तुकडे फ्रिजमधून काढून कपाटात ठेवून द्यायचा. कुणालाही शंका येऊ नये म्हणून तो ते लपवून ठेवायचा. दरम्यान, पोलीस तपास करत आहेत. रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर अवघा देश हादरला असून, संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi bhasha Vijay Live Updates : आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे - उद्धव ठाकरे

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT