देश विदेश

NEET Paper Leak: फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा; 21 जूनचा NEET पेपर 10 लाखांत?

Re-NEET Paper Leak Allegation : नीट पेपरफुटीनंतर NTA नं 21 जूनला फेरपरिक्षेची घोषणा केली. मात्र या पुर्नपरीक्षेच्या पेपरचीही 10 लाखांत विक्री होत असल्याचा खळबळजनक दावा आता करण्यात आलाय.त्यामुळे नीट परीक्षेला पेपरफुटीचं कसं ग्रहण लागलयं? टेलिग्रामवरून पेपर कसा लीक करण्यात येतोय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

नीट पेपरफुटीच्या धक्क्यातून विद्यार्थी आणि पालक अजून सावरलेलेही नाहीत. तेच 'री-नीट' परीक्षेच्या नावाखाली देशात एक प्रचंड मोठा सायबर घोटाळा सुरू असल्याचं समोर आलंय. नीटच्या फेरपरिक्षेचा पेपर तब्बल 10 लाखात टेलिग्रामच्या माध्यमातून विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलायं...अहमदाबाद सायबर गुन्हे शाखेकडे या संदर्भात तक्रार दाखल झालीय.

टेलिग्रामवरील एका ग्रुपमध्ये सहभागी झाल्यावर नीट फेरपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं प्रलोभन दिलं जातं. पेपर हवा असल्यास 10 लाख रुपयांची मागणी केली जाते. सुरुवातीला मुख्य ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 200 ते 500 रुपये टोकन म्हणून घेतले जातात. त्यानंतर अॅडमिनद्वारे पेपर मिळवण्यासंदर्भात एक मिटींग घेतली जाते. बँक अकाऊंट सापडू नये म्हणून विशिष्ट अॅप्लिकेशनचा वापर केला जातो.

मुख्य ग्रुपमध्ये पेपर मिळवण्यासाठी सुरुवातीला 60 हजार घेतले जातात आणि नंतर 10 लाखांची मागणी केली जाते. 21 जूनला परीक्षेआधी पेपर देणार असल्याचा दावा करण्यात आलाय. 21 जूनला होणारा रि-नीटचा पेपर लीक झाल्याचा खळबळजनक दावा शुभम ठाकर या विद्यार्थ्यांनं केलाय.

दरम्यान टेलिग्रामवर 'राघव सर' नावाच्या चॅनेलच्या माध्यमातून नीटचा पेपर उपल्बध करून देत तब्बल 5 कोटी 74 लाख रुपये आरोपींनी कमावल्याचा दावा करण्यात आलाय. वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत 7 हजार 901 लोकांना आरोपींनी पेपर पुरवल्याचा संशय आहे. या आरोपींनी धमकीवजा इशारा दिल्याचा दावा ठाकरने केलाय.

३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर सीबीआयने वेगात तपास करत संशयीत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, असं असताना पुनर्परीक्षेचा पेपरही फुटल्याची चर्चा आहे. त्यामुळे यामागे पूर्वनियोजित कट आहे का? टेलिग्रामच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये गोळा करणारी ही यंत्रणा नेमकी कोणाची आहे? त्याच्या मुळाशी जाऊन तपास यंत्रणा मास्टरमाईंट शोधून काढणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT