Surabhi Jayashree Jagdish
इंडियन क्रिकेटर अर्शदीप सिंगने रविवारी त्याच्या इन्स्टाग्रामवरून एक फोटो पोस्ट केला. यामुळे त्याच्या लव्ह लाईफच्या चर्चा रंगू लागल्यात. या फोटोमध्ये अर्शदीप त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिसतोय.
अर्शदीप सिंगने नुकतंच समरीन कौरसोबत एक खास पोस्ट शेअर करून त्याच्या नात्यावर शिक्कामोर्बत केलं आहे. गेल्या काही काळापासून मॉडेल समरीन कौरला डेट करत असल्याच्या अफवा गेल्या पसरत होत्या.
अर्शदीप सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवरून समरीन कौरसोबतचे दोन फोटो शेअर केलेत. पहिल्या फोटोमध्ये दोघे सेल्फी घेतायत. दुसऱ्या फोटोमध्ये हे कपल एकमेकांकडे पाहून पोज देतंय.
या फोटोला अर्शदीपने दिलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेतंय. यावेळी त्याने फोटोला "My Person" असं लिहीलंय. या पोस्टद्वारे, या क्रिकेटपटूने समरीन कौरसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
७ सप्टेंबर १९९९ रोजी जन्मलेली समरीन कौर जम्मू आणि काश्मीरची रहिवासी आहे. मॉडेलिंग आणि अभिनयात करिअर करण्यापूर्वी, फेमिना मिस इंडिया २०१८ मध्ये अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे ती प्रसिद्धीस आली.
समरीनने पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधून बी.कॉम ऑनर्सचं शिक्षण घेतलं आहे. समरीन आणि अर्शदीप यांच्या रिलेशनशिपच्या अफवा २०२६ च्या आयपीएल सिझनदरम्यान पसरल्या होत्या.
समरीनने कबीर खानच्या '83' या चित्रपटातून एक्टिंगच्या क्षेत्रात डेब्यू केला होता. नंतर तिने 'नेल पॉलिश' या वेब सीरिजमध्ये आणि 'सरदार जी 2' या सिनेमात काम केलंय. तिने पंजाबी प्रोजेक्ट्समध्येही काम केलं असून बादशाह, गुरू रंधावा, जुबिन नौतियाल, जस मानक आणि मनिंदर बुट्टर यांसारख्या कलाकारांसोबतच्या काम केलंय.