Manasvi Choudhary
स्वयंपाकघरात भाजी बनवताना बटाटे उकडण्यासाठी अनेकदा वेळ लागतो यामुळे मोठी अडचण येते.
कुकरमध्ये बटाटे शिजवण्यासाठी साधारण १० ते १५ मिनिटे लागतात यामुळे वेळ भरपूर लागतो यासाठी आज आम्ही तुम्हाला ५ मिनिटांत सोप्या पद्धतीने बटाटे उकडण्याची पद्धत सांगणार आहोत.
मायक्रोव्हेहमध्ये अवघ्या ५ मिनिटांत बटाटे उकडण्याची प्रोसेस होऊ शकते. यासाठी तुम्हाला काय करायचे आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
सर्वातआधी बटाटे स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. यानंतर तुम्ही बटाट्यांची साल काढून किंवा सालीसकट बटाटे उकडू शकता.
त्यानंतर सुरीच्या किंवा काट्याच्या साहाय्याने बटाट्याला सर्व बाजूने २-४ ठिकाणी हलके छिद्र पाडा. यामुळे बटाटे शिजवताना वाफ बाहेर पडेल.
सर्व बटाटे एका काचेच्या भांड्यामध्ये ठेवा त्यानंतर त्यात पाणी घाला.
नंतर ते भांडे मायक्रोव्हेहमध्ये ठेवा आणि ५ मिनिटांसाठी मायक्रोव्हेह सुरू करा.
नंतर वेळ झाल्यावर मायक्रोव्हेहमधून भांडे बाहेर काढा आणि बटाटे शिजले आहेत की नाही ते तपासा.