Manasvi Choudhary
मटकी खायला सर्वांनाच आवडते. मटकीच्या भाजीचे अनेक प्रकार बनवले जातात. तुम्ही कधी मोड आलेली मटकी खाल्ली आहे का?
मोड आलेली मटकी पौष्टिक मानली जाते. मोड आलेल्या मटकीतील पौष्टिक घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
मटकीमध्ये पौष्टिक घटक प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. शरीराची झीज भरून काढण्यासाठी, स्नायू बळकट करण्यासाठी आणि शरीराची उर्जा वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.
मटकीमध्ये कॅलरीज अतिशय कमी असतात ज्यामुळे मोड आलेली मटकी खाल्ल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते वारंवार भूक लागत नाही
मोड आलेली मटकी पचायला हलकी असते यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
मटकीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि विविध अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
मटकीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी मटकीचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
मटकी खाल्ल्याने शरीरातील लोहाची पातळी वाढण्यास मदत होते.