Rs 2000 exchange last date
Rs 2000 exchange last date Saam TV
देश विदेश

Rs 2000 Exchange Last Date: बायबाय 2000 rs.; नोट बदलण्याची शेवटची तारीख डोक्यात फिट्ट करून ठेवा...

Ruchika Jadhav

Rs 2,000 notes withdrawn: साल २०१६ मध्ये २००० रुपयांच्या चलनात आलेल्या नोटा आता बंद करण्यात आल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी हा मोठा निर्णय घेतला. २००० रुपयांची नोट बंद होणार असल्याची घोषणा करताच नागरिकांच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर उठले आहे. नोट बंद झाल्यानंतर आता आपल्या जवळ असलेल्या नोटा कशा बदलायच्या? तसेच नोट बदलण्यासाठीची शेवटची तारीख काय आहे? अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ. (Latest Rs 2,000 Notes Update)

रिझर्व्ह बँक ऑफ इंजियाने २००० रुपयांच्या नोटा तात्काळ चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या नोटा ३० सप्टेंबर पर्यंत चलनात राहतील. ज्या व्यक्तींकडे या नोटा आहेत त्यांनी बँकेत जाऊन त्या बदलून घ्याव्यात असे RBI मार्फत सांगण्यात आले आहे.

२०१८-२०१९ मध्येच थांबवली छपाई

आरबीआयने हा निर्णय जाहीर करताना आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, साल २०१८-२०१९ मध्येच २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१६ मध्ये या नोटा चलनात आल्या. तसेच १००० रुपयांची नोट बंद करण्यात आली होती.

दरम्यान, २०१६ मध्ये रिझर्व्ह बँकेने नोटाबंदी केल्यानंतर २००० रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून बाजारात २००० रुपयांच्या नोटा कमी दिसत होत्या. एटीएममधून २००० रुपयांच्या नोटाही बाहेर येत नसल्याचे लोकांनी सांगितले. या संदर्भात सरकारने संसदेत माहितीही दिली होती.

नोट बदलण्याची शेवटची तारीख

२००० रुपयांची नोट बदलण्यासाठी शेवटची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर पर्यंत तुमची २००० ची नोट पाकीटात राहू शकते. या तारखेपर्यंतच तुम्ही ही नोट बदलून घेऊ शकता. बँकेत नोट बदलून तु्म्हाला त्याच्या जागी वैध चलन दिले जाईल. शेवटची तारीख आणखीन वाढवली जाणार की नाही याची माहिती मिळालेली नसून सध्या तरी २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे.

नोटा बदलण्यासाठी वेगळ्या खिडकीची सोय

बँकेत इतर दिवशी देखील मोठी गर्दी असते. अशात आता २००० रुपयांच्या नोटा बंद केल्यावर ही गर्दी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये नोटबंदी झाली होती तेव्हा बँकेत नोटा बदलण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अशात आता नागरिकांची गैरसोय होऊनये यासाठी प्रत्येक बँकेत नोटा बदलण्यासाठी स्वतंत्र विंडो असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi: PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT