RBI Monetary Policy Saam TV
देश विदेश

RBI Monetary Policy: सर्वसामान्यांचा कर्जाचा हप्ता पुन्हा वाढणार? RBI आज नवीन पतधोरण जाहीर करणार

RBI MPC Meeting: सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आज भारतीय रिझर्व्ह बँक चालू आर्थिक वर्षातील दुसरे पतधोरण जाहीर करणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

RBI Monetary Policy: सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आज भारतीय रिझर्व्ह बँक चालू आर्थिक वर्षातील दुसरे पतधोरण जाहीर करणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास गुरूवारी सकाळी १० वाजता नवीन पतधोरण जाहीर करतील. यावेळी रेपो रेटमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, तरी सुद्धा याचा परिणाम गृहकर्जाच्या ईएमआयवर होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

एप्रिल २०२३ मध्ये आरबीआयची पॉलिसी बैठक झाली होती. यावेळी आरबीआयने लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी (LAF) अंतर्गत पॉलिसी रेपो दर ६.५०% वर अपरिवर्तित ठेवला होता. त्यानंतर, स्थायी ठेव सुविधा (SDF) दर देखील ६.२५% वर अपरिवर्तित ठेवला, तर सीमांत स्थायी सुविधा (MSF) दर आणि बँक दर देखील ६.७५% वर कायम ठेवला.

गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या महागाईला आळा घालण्यासाठी आरबीआयने (RBI) गेल्यावर्षी मे २०२२ मध्ये रेपो दरात वाढ केली होती. २५० बेस पॉईंट्सची ही वाढ होती. या वाढीमुळे बँकांचे कर्ज आणि ठेवींच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती.

रेपो वाढले तर गृहकर्जावर परिणाम

दरम्यान, आरबीआयने पॉलिसी रेटमध्ये आणखी वाढ केल्यास सर्वसामान्यांना मोठा झटका बसू शकतो. कारण, गृहकर्जावरील व्याजदर सर्वकालीन उच्चांक गाठू शकतो आणि जवळजवळ दुहेरी अंकांना स्पर्श करू शकतो. याचा परिणाम घर खरेदी करणाऱ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे घराची मागणी कमी होऊ शकते.

त्याचबरोबर आणखी एका दरवाढीमुळे विकासकांसाठी (डेव्हलपर्स) कर्ज (Loan) घेण्याच्या खर्चातही वाढ होईलच पण बाजारातील एकूण आत्मविश्वास मजबूत करण्यासाठी आणि घर खरेदीदारांसाठी ते अधिक आकर्षक बनवण्यासाठी नजीकच्या भविष्यात व्याजदरात आणखी कपात करण्यास प्राधान्य दिले जाईल.

याबाबत माहिती देताना नाईट फ्रँकचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, गृहकर्जाच्या मागणीवर दर वाढीचा परिणाम आतापर्यंत कमी झाला आहे. गेल्या एका वर्षात उच्च व्याजदर आणि चलनवाढ असूनही निवासी मागणी उत्तेजित राहिली आहे, जे गृहखरेदीकडे ग्राहकांची पसंती दर्शवते. मात्र, जागतिक मंदीमुळे आर्थिक विकासाला प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. तर उच्च व्याजदराचा संपूर्ण परिणाम अद्याप दिसणे बाकी असून आम्ही गृहनिर्माण बाजारावरील परिणामाबद्दल सावध आहोत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rinku Rajguru: अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या लेकीच्या संघर्ष; रिंकू राजगुरु लवकरच पहिल्यांदाच दिसणार अॅक्शन अवतारात

Bribe Case : रायगडमध्ये खळबळ! सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं; गुन्हा दाखल

Dum Aloo Recipe: रेस्टॉरंटसारखी चमचमीत दम आलू भाजी घरीच बनवा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: कार्तिकी यात्रेनिमित्त आजपासून विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू; व्हीआयपी दर्शनही बंद

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता 'ही' कार वापरणे अनिवार्य; सरकार देणार तब्बल २० लाखांचं बजेट

SCROLL FOR NEXT