RBI Repo Rate Hike
RBI Repo Rate Hike SAAM TV
देश विदेश

RBI Repo Rate Hike: कर्जे महाग होणार, तुमचा EMI वाढेल; RBI कडून रेपो दरात वाढ

वृत्तसंस्था

RBI Hike Repo Rate: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग तिसऱ्यांदा वाढ केली आहे. याबाबद रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shashikant Das) यांनी शुक्रवारी जाहीर केले. रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर रेपो दर 5.40 टक्के झाला आहे. आरबीआयने या वर्षी सलग तिसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे.

यापूर्वी मे महिन्यात रेपो दरात अचानक ०.५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती, तर जूनच्या एमपीसीच्या बैठकीत ०.४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. अशाप्रकारे मे महिन्यापासून रेपो दरात एकूण १.४० टक्के वाढ झाली आहे, जी गेल्या अडीच वर्षांतील सर्वोच्च आहे.

हे देखील पाहा -

आरबीआयच्या रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयानंतर बँका गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून कर्ज महाग करणार आहेत, आणि महागड्या कर्जाचा सर्वात मोठा फटका अशा लोकांना सहन करावा लागेल ज्यांनी अलीकडच्या काळात बँक किंवा गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून गृहकर्ज घेऊन घर खरेदी केले आहे. RBI ने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, जो आता 5.40 टक्के झाला आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांत आरबीआयने कर्ज 1.40 टक्क्यांनी महाग केले आहे.

20 लाखांचे गृहकर्ज

समजा, तुम्ही 20 वर्षांसाठी 6.85 टक्के व्याजदराने 20 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, तर तुम्हाला 15,326 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. परंतु रेपो रेटमध्ये एकूण 1.40 बेसिस पॉइंट्स तीन वेळा वाढ केल्यानंतर, गृहकर्जावरील व्याजदर 8.25 टक्क्यांपर्यंत वाढेल, त्यानंतर तुम्हाला 17,041 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच तीन महिन्यांत 1715 रुपये अधिक EMI महाग होईल. संपूर्ण वर्षभरात तुमच्या खिशावर 20,580 रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

40 लाखांचे गृहकर्ज

जर तुम्ही 15 वर्षांसाठी 6.95 टक्के व्याजदराने 40 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, तर तुम्हाला सध्या 35,841 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. पण रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढवल्यानंतर व्याजदर 8.35 टक्के होईल, त्यानंतर तुम्हाला 38,806 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच दर महिन्याला 2965 रुपये अधिक EMI भरावे लागतील. आणि संपूर्ण वर्ष जोडल्यास 35,580 अधिक EMI भरावे लागतील.

रेपो रेट म्हणजे काय?

ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर म्हणजे रेपो रेट. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. जर आरबीआयने रेपो रेट वाढवला तर बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर देखील कमी होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

SCROLL FOR NEXT