Reserve Bank of India Penalty Saam Tv
देश विदेश

RBI Action: भारतीय रिझर्व्ह बँकेने १० बँकांना ठोठावला लाखो रुपयांचा दंड; ग्राहकांवर काय होईल परिणाम?

Reserve Bank of India Penalty: भारतीय रिझर्व बँकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरबीआयने देशातील १० बँकांना जवळपास ६० लाखांचा दंड ठोठावला आहे.

Satish Daud

Reserve Bank of India 10 Bank 60 Lakhs Penalty

भारतीय रिझर्व बँकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरबीआयने देशातील १० बँकांना जवळपास ६० लाखांचा दंड ठोठावला आहे. नियामकीय मार्गदर्शन सूचनांचे पालन आणि ग्राहकांच्या खात्यांची सुरक्षितता न केल्याचा ठपका ठेवत हा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेशातील बँकांचा समावेश आहे.

आरबीआयने २६ आणि २७ मार्च रोजी या बँकांना नोटीस पाठवली होती. यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आरबीआयने कोणत्या १० बँकांना दंड ठोठावला आहे ते जाणून घेऊया.

आरबीआयने १० बँकांना ठोठावला दंड

  • आरबीआयने सोलापूर जनता सहकारी बँकेला 28.30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

  • जनलक्ष्मी सहकारी बँक, नाशिक : RBI ने जनलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेला 59.90 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे.

  • RBI ने स्टँडर्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला औरंगाबाद (महाराष्ट्र) ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमांनुसार निधीच हस्तांतरण केल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

  • निधीशी संबंधित तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई स्थित उत्कृष्ट सहकारी बँक लिमिटेडला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

  • आरबीआयने हावडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (पश्चिम बंगाल) १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

  • आरबीआयने राजपालयम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडला (तामिळनाडू) ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

  • याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेने मंडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, हिमाचल प्रदेश चिक्कमगलुरु जिल्हा सहकारी सेंट्रल बँक लिमिटेड, चिक्कमगलुरू, कर्नाटक दिंडीगुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, दिंडीगुल, मथुरा जिल्हा सहकारी बँक, उत्तर प्रदेश या बँकांवर देखील दंडात्मक कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT