RBI चा मोठा खुलासा; देशात येणार स्वतःची डिजिटल करन्सी Saam Tv
देश विदेश

RBI चा मोठा खुलासा; देशात येणार स्वतःची डिजिटल करन्सी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी गुरुवारी सांगितले की, आरबीआय टप्प्याटप्प्याने स्वतःचे डिजिटल करन्सी राबविण्याच्या धोरणावर काम करत आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली:  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी गुरुवारी सांगितले की, आरबीआय टप्प्याटप्प्याने स्वतःचे डिजिटल करन्सी Digital Currency राबविण्याच्या धोरणावर काम करत आहे. ते घाऊक आणि किरकोळ क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर बाजारात आणण्याच्या प्रक्रियेत आहे. 

ते म्हणाले की सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDC बद्दलची विचारसरणी झाली आहे आणि जगातील अनेक केंद्रीय बँका या संदर्भात काम करत आहेत. भारतातही याबाबत गांभीर्यानं काम सुरू आहे. तसेच कोणतीही सरकारी मान्यता न मिळालेल्या डिजीटल चलनांपासून ग्राहकांनी सावध राहावे असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हे देखील पहा-

एका कार्यक्रमात त्यांनी माहिती दिली कि, देशात लवकरच डिजीटल चलन कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. जगातील इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांप्रमाणेच डिजिटल चालनासंबंधी  भारतीय रिझर्व्ह बँकेचा सुद्धा बऱ्याच काळापासून यावर आधारित वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करत आहेत. 

देशात रिझर्व्ह बँकेला स्वतःचं डिजीटल चलन सादर करण्याची शिफारस केली आहे, त्यामुळे रिझर्व्ह बँक स्वतःचं डिजीटल चलन टप्प्याटप्प्यानं कार्यान्वित करण्याच्या धोरणावर काम करत आहे. तसेच याची आमलबजावी अश्या प्रकारे केली जाईल की, बँकिंग प्रणाली Banking System आणि आर्थिक धोरणावर कोणताही परिणाम होणार नाही. असेही त्यांनी नमूद केले आहे.

देशाला स्वतःचं डिजीटल चलन आणण्यासाठी काही कायद्यात दुरुस्ती करणं आवश्यक असणार आहे. यासाठी फेमा, नाणी कायदा आणि आयटी कायद्यातही सुधारणा करण्याचीही गरज भासणार असल्याचं रविशंकर यांनी माहिती दिली.

डिजिटल चलन हे दोन प्रकाराचे असते. पहिला म्हणजे होलसेल डिजिटल करन्सी. दुसर म्हणजे रिटेल डिजिटल करन्सी. सामान्य लोक आणि कंपन्या रिटेल डिजिटल करन्सीचा वापर करतात. तर आर्थिक संस्थांद्वारे होलसेल डिजिटल करन्सीचा वापर केला जातो.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणी अपडेट, केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या अडचणी वाढणार? चेंडू थेट पंतप्रधानांच्या कोर्टात

SCROLL FOR NEXT